साडेतीन कोटींंची आइस फॅक्टरी

By admin | Published: July 15, 2016 01:24 AM2016-07-15T01:24:43+5:302016-07-15T01:24:43+5:30

राज्य शासनाच्या एन सी डी सी योजनेअंतर्गत ३ कोटी ३४ लाखाच्या निधीमधून सातपाटी येथे उभारण्यात आलेल्या ७० टन उत्पादन क्षमतेचे व ४०० टन साठवणूक क्षमतेच्या आधुनिक

Ice factory of three and a half million | साडेतीन कोटींंची आइस फॅक्टरी

साडेतीन कोटींंची आइस फॅक्टरी

Next

पालघर : राज्य शासनाच्या एन सी डी सी योजनेअंतर्गत ३ कोटी ३४ लाखाच्या निधीमधून सातपाटी येथे उभारण्यात आलेल्या ७० टन उत्पादन क्षमतेचे व ४०० टन साठवणूक क्षमतेच्या आधुनिक नवीन आईस फॅक्टरी व शीतगृह प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी डॉ. दादा परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शीतगृहाचा उपयोग किनाऱ्यावरील मुरबे, एडवण, वडराई, माहिम, केळवे, इ. अनेक गावातील मासेमारी व्यवसायाला होणार आहे.
शेटजी, सावकारापासून ते सर्व प्रकारच्या फसवणूक-पिळवणूकीपासून गरीब मच्छिमारांची मुक्तता करण्याची महत्वपूर्ण कामगिरी सातपाटीच्या दोन्ही सहकारी संस्थानी केली आहे. त्यांच्या कार्यामुळेच ६९ वर्षापूर्वी लावलेल्या छोटयाशा रोपटयाचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पहावयास मिळत असल्याचे गौरवोद्गार डॉ. विनायक उर्फ दादा परूळेकर यांनी काढले. यावेळी अध्यक्ष-नरेंद्र पाटील, आमदार अमीत घोडा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, सरपंच कांचन मेहेर, रामकृष्ण केणी, इ. मान्यवरवर उपस्थित होते.
मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त विनोद नाईक यांच्या संकल्पनेतून सातपाटी मध्ये अद्ययावत शीतगृह उभारणीची कल्पना सर्वोदय संस्थेच्या माजी चेअरमनांची होती. सन २००५-०६ मध्ये एनसीडीसी अंतर्गत शीतगृहाच्या उभारणीचा प्रस्ताव देण्यात आला. त्यातून आज भव्य असे बर्फ उत्पादन व साठवणुकीचे शीतगृह उभे राहिले.
गावच्या वैभवामध्ये या वास्तूने भर घातली असून मोरारजी देसाई यांनी १९५६ साली उद्घाटन केलेल्या बर्फ कारखान्यानंतर हा नवा अद्ययावत बर्फ कारखाना साकारणे हे एक प्रगतीचे लक्षण असल्याचेही डॉ. परूळेकर यांनी सांगितले.
सातपाटी गावच्या दोन पिढया मी जवळून पाहत असताना आजही ७५ वर्षीय वृध्द मासेमारीला समुद्रात जात असल्याचे पाहिल्यानंतर त्यांच्या मेहनतीला सलाम करावासा वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Ice factory of three and a half million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.