आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची अर्जात बदल करण्यासाठी धावपळ, नव्या जीआरमुळे फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 02:34 AM2019-06-23T02:34:25+5:302019-06-23T02:35:19+5:30

आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत.

ICSE's students' Running for change in the application | आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची अर्जात बदल करण्यासाठी धावपळ, नव्या जीआरमुळे फटका

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची अर्जात बदल करण्यासाठी धावपळ, नव्या जीआरमुळे फटका

Next

- जान्हवी मोर्ये

डोंबिवली - आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे आॅनलाइन अर्जात बदल करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. विद्यार्थ्यांनी सेंटरला भेट देऊन आपल्या अर्जातील पहिल्या भागात बदलण्यास सुरुवात केली आहे. कल्याणच्या मुथा महाविद्यालयातील सेंटरमध्ये शनिवारी १०० विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जात बदल केल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रुती वाईकर यांनी दिली.
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांची विषयांची संख्या तसेच गुणपद्धती राज्यातील बोर्डापेक्षा वेगळी आहे. मात्र, राज्य सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार अकरावीत प्रवेशासाठी आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ग्राह्य धरताना पहिल्या पाच विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी गुणपत्रिकेवरील सहा विषयांपैकी सरासरीसाठी पाच सर्वोत्तम (बेस्ट फाइव्ह) विषयांचे गुण धरले जात होते. मात्र, याविषयीची माहिती शाळांपर्यंत पोहोचलेली नाही.

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आधीच भरले असल्याने त्यांना आता गुणपत्रिकेतील गुण बदलण्यासाठी पुन्हा अर्जाचा पहिला भाग भरावा लागत आहे. त्यामुळे आपोआपच भाग दोनही भरावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी सेंटरकडे धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डोंबिवलीत पूर्वेत के.बी. वीरा शाळा आणि पश्चिमेत साउथ इंडियन हायस्कूलमध्ये तर, कल्याणमध्ये मुथा महाविद्यालयात केंद्र ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्जात बदल करणे सोयीचे जावे, यासाठी रविवारी सकाळी १० ते ३ ही केंद्रे खुली असणार आहेत. २५ जूनला अकरावी प्रवेशाची बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तोपर्यंत ही प्रक्रि या पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी फॉर्ममध्ये बदल केला. तर, सर्वसाधारण गुणवत्ता यादी १ जुलैला जाहीर होणार आहे.

हा निर्णय चुकीचा!
ओमकार इंटरनॅशनल आयसीएसई स्कूलच्या संस्थापिका दर्शना सामंत म्हणाल्या, यंदाच्या वर्षी राज्य मंडळाने अंतर्गत गुण बंद केले आहेत. त्यामुळे इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशही सरासरी गुणांच्या आधारे व्हावा, असे बोलत आहे. पण, मुळातच या बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पातळी कठीण असते. त्या तुलनेत राज्यातील बोर्डाची नाही. मग, असे असतानाही आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी चुकीचा निर्णय घेतला गेला आहे. यासंदर्भातील लेखी जीआर आमच्यापर्यंत अजून पोहोचला नाही. पण, सरासरी गुणांच्या आधारे प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: ICSE's students' Running for change in the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.