ठाण्यात ठिकठिकाणी कृत्रिम तलावांसह मूर्ती स्वीकार केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:18+5:302021-08-28T04:44:18+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेने यंदादेखील श्रींच्या मूर्तींचे विधीवत विसर्जन व्हावे यासाठी कृत्रिम तलावांच्या निर्मितीसह मूर्ती स्वीकार केंद्र उभारण्यात ...
ठाणे : ठाणे महापालिकेने यंदादेखील श्रींच्या मूर्तींचे विधीवत विसर्जन व्हावे यासाठी कृत्रिम तलावांच्या निर्मितीसह मूर्ती स्वीकार केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.
यात मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजीनगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं. १, रायलादेवी तलाव नं. २, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुड्स उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर (हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनिक्षेपण यंत्रणा, आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
येथे असणार मूर्ती स्वीकार केंद्र
मासुंदा तलाव, मढवी हाऊस, वर्तकनगरमध्ये देवदयानगर, शिवाईनगर, चिरंजिवी हॉस्पिटल, महागिरी कोळीवाडा, कोपरी प्रभाग समिती कार्यालय, किसननगर बसस्टॉप, मॉडेला चेक नाका, टेंभी नाका, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, पवार बसस्टॉप, वसंतविहार शाळा, कामगार हॉस्पिटल, लोकमान्यनगर बसस्टॉप यशोधननगर, रजिन्सी हाईट्स, ट्रॉपिकल लगूनसमोर आनंदनगर, विजयनगरी ॲनेक्सा कासारवडवली, लोढा लक्डोरिया, जेल तलाव, सह्याद्री शाळा मनीषानगर, दत्तमंदिर, शीळ प्रभाग कार्यालय, आदी ठिकाणी श्री गणेश मूर्ती स्वीकार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर प्राप्त होणाऱ्या सर्व गणेशमूर्तींचे महापालिकेमार्फत विधीवत विसर्जन करण्याची व्यवस्था केली असून, त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डीजी ठाणे प्रणालीद्वारेदेखील विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजनाही राबविण्यात येणार आहे.