शस्त्रक्रिया करून पायातून काढली विठ्ठलाची मूर्ती; ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया

By अजित मांडके | Published: May 28, 2024 05:40 PM2024-05-28T17:40:15+5:302024-05-28T17:41:32+5:30

मुलुंड पश्चिम येथे राहणारे ७५ वर्षीय आजोबा हे देवघरात साफसफाईचे काम करत असताना, चार महिन्यापूर्वी स्टुलावरून पडले, त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळाव्यात काही तरी घुसल्याने त्यांना जखम झाली होती.

Idol of Vitthal surgically removed from leg; | शस्त्रक्रिया करून पायातून काढली विठ्ठलाची मूर्ती; ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया

शस्त्रक्रिया करून पायातून काढली विठ्ठलाची मूर्ती; ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया

ठाणे : देवघरात साफसफाई करीत असताना, स्टुलावरून पडल्याने एका ७५ वर्षीय आजोबांच्या पायात काही तरी घुसल्याचे त्यावेळी त्यांना जाणविले. यावेळी पायाला झालेली जखम बरी होवून देखील पाय दुखत असल्याने त्यांनी ४ महिन्यानंतर पायाचा एमआरआय काढला असता, त्यात काही तरी असल्याचे दिसून आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तळपायात विठ्ठलाची मूर्ती असल्याचे आढळून आले.

मुलुंड पश्चिम येथे राहणारे ७५ वर्षीय आजोबा हे देवघरात साफसफाईचे काम करत असताना, चार महिन्यापूर्वी स्टुलावरून पडले, त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळाव्यात काही तरी घुसल्याने त्यांना जखम झाली होती. ती जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर देखील पाय दुखत होता. तसेच पायातून पाणी येत असल्याने त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या पायाचा पहिला एमआरआय काढला त्यावेळी तो नॉर्मल आला होता. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा एमआरआय काढल्यानंतर काहीतरी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अर्थोपेडीक सर्जन डॉ. विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या ७५ वर्षीय आजोबांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत, अर्धा तासाच्या यशस्वी प्रयत्नाने पायातून ती वस्तू बाहेर काढली. यावेळी ती लोखंडाची पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याचे समोर आले.

Web Title: Idol of Vitthal surgically removed from leg;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.