बजेटची महासभा लावल्यास ती बेकायदेशीर असेल, या सभेला अनुउपस्थित राहण्याचा लोकशाही आघाडीने दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:15 PM2018-03-22T17:15:22+5:302018-03-22T17:15:22+5:30

नियमानुसार बजेटची महासभा चर्चेविना संपली असल्याने त्यावर पुन्हा चर्चा झाली तर ती बेकायदेशीर असेल असा इशारा लोकशाही आघाडीने दिला आहे. त्यामुळे या सभेलाच अनुउपस्थित राहण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

If the budget session is illegal, it will be unlawful, the Lok Sabha alliance has kept this meeting unacceptable. | बजेटची महासभा लावल्यास ती बेकायदेशीर असेल, या सभेला अनुउपस्थित राहण्याचा लोकशाही आघाडीने दिला इशारा

बजेटची महासभा लावल्यास ती बेकायदेशीर असेल, या सभेला अनुउपस्थित राहण्याचा लोकशाही आघाडीने दिला इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांनी पुन्हा बजेटची महासभा लावू नये३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावू

ठाणे - नियमानुसार राष्ट्रगीत झाल्याने बजेटवरील महासभा संपली असा त्याचा अर्थ होत आहे. त्यामुळे आता त्यावर पुन्हा महासभा लावली जात असेल तर ती बेकायदा ठरेल असा मुद्दा लोकशाही आघाडीने लावून धरला आहे. त्यामुळे अशा बेकायदा महासभेला उपस्थित राहणार नसल्याचे लोकशाही आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. नियमानुसार अर्थसंकल्पीय विषय पत्रिका मंजूर झाली आहे. आयुक्तांनी अत्यंत चांगले अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यामध्ये आम्ही सूचवलेल्या सूचनांचा समाविष्ट करावा, असे म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकाला पाठिंबा दिला आहे, असे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
         ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले आहे. हे अंदाजपत्रक विनाचर्चा मंजूर झालेले असतानाही सत्ताधारी पक्षाकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुुरु केली आहे. या पाशर््वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ३८ नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अंदाजपत्रकाला पाठिंबा जाहीर केला. या वेळी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेसचे शहारध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे गटनेते विक्र ांत चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, मुकूंद केणी यांच्यासह विरोधी पक्षांचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
               मिलींद पाटील यांनी सांगितले की, १९ मार्च रोजी झालेल्या महासभेमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या सभेमध्ये आयुक्तांच्या विश्लेषणानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यामुळे ही सभा संपलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सभा तहकूब किंवा खंडीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्याने सभा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही बाब नजीब मुल्ला यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. ठाण्याच्या विकासासाठी हा अत्यंत चांगला अर्थसंकल्प असल्याने त्यास आमचा पाठिंबा असून नगरसेवकांच्या प्रभागामध्ये असलेल्या नागरी कामांच्यासाठी आयुक्तांनी निधी द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे. आयुक्तांनीही या मागणीला सकारात्मकता दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हा अर्थसंकल्प नियमानुसार मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी जरी नव्याने महासभा बोलावण्याचा प्रयत्न केला तर, ती सभा आधी कायदेशीर आहे की बेकायदेशीर? हे आम्ही पडताळून पाहणार असून त्यानंतर ही महासभा बेकायदेशीर असल्यास अनुपिस्थत राहू, असेही पाटील यांनी सांगितले. तर, बुधवारच्या महासभेला अधिकारी वर्ग अनुपिस्थत राहणे हा सत्ताधाºयांचा पराभव असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
चौकट - ठाणे महापालिकेकडून ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असला तर ठाणेकरांच्या हितासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा देखील यावेळी लोकशाही आघाडीने दिला.



 

Web Title: If the budget session is illegal, it will be unlawful, the Lok Sabha alliance has kept this meeting unacceptable.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.