...तर मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी चाळे करणाऱ्यावर कडक कारवाई झाली असती
By जितेंद्र कालेकर | Published: October 8, 2018 10:47 PM2018-10-08T22:47:24+5:302018-10-08T22:57:24+5:30
चिमुकलीशी लैंगिक चाळे करणारा जगदीश रॉय ज्या मोबाईल क्लिपींगमध्ये कैद झाला, ती क्लिपींग पोलिसांकडे आधी दाखविली जाणे आवश्यक होते. तसे झाले असते त्याच्यावर कडक कारवाई करता आली असती, असा दावा आता पोलिसांनी केला आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणारा जगदीश रामलखन रॉय (५२) हा ज्या मोबाईल क्लिपिंगमध्ये कैद झाला, ती क्लिपिंग आधी पोलिसांना दाखविणे आवश्यक होते. तसे झाले असते तर त्याच्यावर त्याचवेळी कडक कारवाई करता आली असती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. जगदीश याने ४ आॅक्टोंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वा. च्या सुमारास रतनभाई कंपाऊडच्या परिसरात एका अल्पवयीन मुलीशी मद्यधुंद अवस्थेत लैंगिक चाळे केले. हे चाळे करण्यापूर्वी तो त्याचे गुप्तांग बाहेर काढून विचित्र चाळे करीत होता. हा प्रकार तिथे मंडपाचे काम करणाºया अरविंद चौगुले याच्यासह काही मुलांना दिसला. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जवळच उभ्या असलेल्या एका अडीच वर्षीय मुलीशी तो अश्लील चाळे करु लागला. इथपर्यंत या क्लिपींगमध्ये दिसते. त्यानंतर तो आणखीही काही करण्याच्या इराद्याने त्या मुलीच्या समोर उभा राहिला त्यावेळी या मुलांनी त्याला पकडून श्रीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पण, मोबाईलमधील ही क्लिपिंग पोलिसांना दाखविण्यात आलीच नाही. केवळ तो एका अडीच ते तीन वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे करीत होता, अशी तक्रार त्याला घेऊन येणाºयांनी दिली. प्रत्यक्षात फिर्याद दाखल करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. शिवाय, त्यावेळी ही मुलगी किंवा तिचे आई वडील हेही कोणाला माहित नव्हते. तरीही पोलिसांनी त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यापोटी त्याच्याकडून १२०० रुपये अनामत रक्कमही घेतली. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.
...................
हीच क्लिपिंग या मुलांनी मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना दाखविल्यानंतर रॉयचा शोध घेऊन मनसैनिकांनी प्रसारमाध्यमांसमोर सोमवारी हजर करीत त्याची यथेच्छ धुलाई केली.
.......................
पोलिसांनी घेतला शोध
चार दिवसांनी पुन्हा त्याच आरोपीला व्हीडीओ क्लिपींगसह मनसेच्या सैनिकांनी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या मुलीचा आणि तिच्या आई वडीलांचा शोध घेण्यात आला. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिने हा प्रकार घरात सांगितलाच नाही. असा काहीतरी व्हीडीओ व्हायरल झाल्याचे पोलिसांनीच सांगितल्यानंतर मुलीच्या आईने याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार विनयभंग, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) आणि बलात्कार अशा कलमान्वये गुन्हा दाखल करुन रॉयला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी दिली. त्याने आणखीही असे काही प्रकार केले आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सांगितले.