दंड न भरल्यास त्या रुग्णालयांची मालमत्ता पालिका करणार जप्त, प्रत्येक खाजगी हॉस्पीटलची पथक करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 04:35 PM2020-06-08T16:35:31+5:302020-06-08T16:36:16+5:30

महापालिकेने शहरातील दोन खाजगी रुग्णालयांना १६ लाखांचा दंड ठोठावला आहे. परंतु दंडाची रक्कम सात दिवसात न भरल्यास मालमत्ता कर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचा म्हणजेच वेळ प्रसंगी मालमत्ता जप्त करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच या पुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी ४ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे.

If the fines are not paid, the property of those hospitals will be confiscated by the corporation, and a team will inspect each private hospital. | दंड न भरल्यास त्या रुग्णालयांची मालमत्ता पालिका करणार जप्त, प्रत्येक खाजगी हॉस्पीटलची पथक करणार पाहणी

दंड न भरल्यास त्या रुग्णालयांची मालमत्ता पालिका करणार जप्त, प्रत्येक खाजगी हॉस्पीटलची पथक करणार पाहणी

googlenewsNext

ठाणे : कोणतीही लक्षणे नसतानाही त्यांना रुग्णांना रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने दोन खासगी रु ग्णालयांवर कारवाई केली केली आहे. या दोन रुग्णालयांना १६ लाखांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांच्या मुदतीत हा दंड भरला नाहीतर मालमत्ता कर वसुली नियमाप्रमाणेच या दंडाच्या रक्कमेची वसुली करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली तर संबंधित रु ग्णालयाची मालमत्ता जप्त होण्याची चिन्हे आहेत.
           ठाणे महापालिका क्षेत्रातील करोनाबाधित रु ग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने खासगी रु ग्णालये ताब्यात घेतली असून ही रु ग्णालये कोवीड रु ग्णालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. असे असले तरी शहरातील करोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्या तुलनेत ही रु ग्णालयेही अपुरी पडत आहेत. त्यामुळे एखाद्या रु ग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसतील किंवा रु ग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल तर त्यांना कोवीड काळजी केंद्र किंवा घरीच उपचार करणे अपेक्षित आहे. अशा रु ग्णांना रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले तर आवश्यक असलेल्या रु ग्णांना रु ग्णालयात उपचारासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळेच राज्य शासनाकडूनही तशाप्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही ठाण्यातील दोन खासगी रु ग्णालयांनी कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या आणि त्रासही जाणवत नसलेल्या रु ग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले होते. महापालिका प्रशासनाकडून रोजच्या रोज शहरातील रु ग्णालयातील शिल्लक जागांचा आढावा घेतला जात असून या आढाव्यादरम्यान ही बाब समोर आली. त्यानुसार या दोन्ही खाजगी रु ग्णालयांना महापालिका प्रशासनाने चार दिवसांपूर्वी नोटीस पाठविली होती. मात्र, दोन्ही रु ग्णालयांकडून नोटीसला स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे या नोटीसचा कालावधी संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने दोन्ही रु ग्णालयांना मिळून १६ लाखांचा दंड आकारण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीची नोटीस बजावली. यामध्ये तीन रु ग्णांना सात दिवस दाखल करून ठेवल्याप्रकरणी एका रु ग्णालयाला तीन लाख तर १३ रु ग्णांना ७ दिवस रु ग्णालयात दाखल करून ठेवल्याप्रकरणी १३ लाख रु पयांचा दंड आकरण्यात असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त विश्वानाथ केळकर यांनी दिली. सात दिवसांच्या मुदतीत हा दंड भरला नाहीतर मालमत्ता कर वसुली नियमाप्रमाणेच या दंडाच्या रक्कमेची वसुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार वेळ प्रसंगी संबधींत रुग्णालयांची मालमत्ताही जप्त होऊ शकणार आहे.
दुसरीकडे असे प्रकार टाळण्यासाठी महाापलिकेने चार जणांचे एक पथक तयार केले असून या पथकाचे माध्यमातून शहरातील या रुग्णालयांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा त्रुटी किंवा चुका आढळल्यातर इतर रुग्णालयांवर देखील कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेने दिला आहे.
 

Web Title: If the fines are not paid, the property of those hospitals will be confiscated by the corporation, and a team will inspect each private hospital.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.