हिंमत असेल तर मेहतांनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी, प्रताप सरनाईक यांचे प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 02:43 AM2018-12-23T02:43:16+5:302018-12-23T02:43:30+5:30

युती झाली नाही तर शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांचा २५ हजार मतांनी पराभव करू, असे आव्हान देणाऱ्या भाजपा आ. नरेंद्र मेहता यांना आता सरनाईक यांनी प्रतिआव्हान दिले आहे.

If it is frustrated, Mehta should contest the election before me, Pratap Sarnaik's reply | हिंमत असेल तर मेहतांनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी, प्रताप सरनाईक यांचे प्रतिआव्हान

हिंमत असेल तर मेहतांनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी, प्रताप सरनाईक यांचे प्रतिआव्हान

Next

मीरा रोड : युती झाली नाही तर शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांचा २५ हजार मतांनी पराभव करू, असे आव्हान देणाऱ्या भाजपा आ. नरेंद्र मेहता यांना आता सरनाईक यांनी प्रतिआव्हान दिले आहे. मेहतांना एवढीच मस्ती असेल, तर त्यांनी माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी. त्यांना त्रासलेली जनता आणि शिवसैनिक त्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे सरनाईक म्हणाले.
हाटकेशमधील ग्रामपंचायत काळातील जुन्या कंपन्यांवरील कारवाईवरून मेहता-सरनाईक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
अलीकडेच मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन युती झाली नाही, तर सरनाईकांचा २५ हजार मतांनी पराभव करू, असा इशारा दिला होता. त्याचा समाचार घेताना सरनाईक यांनी मेहता यांना आपल्यासमोरच निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले.
मेहता यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देण्याकरिता शुक्रवारी रात्री सरनाईकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘मेट्रो’ हा शब्द मेहतांना माहीत नसेल तेव्हापासून आपण मेट्रोतून प्रवास करत आहोत.
गोडदेव, नवघर, इंद्रलोककडे येणारी मेट्रो या मार्गात असलेल्या अतिउच्च दाबाच्या विद्युतटॉवरमुळे वगळली असली, तरी ठाणे वा वसई-विरारकडील प्रस्तावित मेट्रोशी हा परिसर जोडावा, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. माझं ‘विहंग इन’ हे तीन तारांकित हॉटेल आहे. मेहता व त्यांच्या काही नगरसेवकांसारखे ‘चद्दर पलटी’ लॉज नाही, असा टोला लगावला. मेहता यांनी सेनेच्या नादाला लागू नये, असा इशारा सरनाईकांनी दिला.

आम्ही प्रशासनासोबत

शहरातील रस्ता रुंदीकरण लोकांच्या आवश्यकतेनुसार झाले पाहिजे. पालिका प्रशासनासोबत आम्ही आहोत.
सुपाºया घेऊन व नियम डावलून लोकांना रोजगार देणाºया कंपन्या उद्ध्वस्त होऊ देणार नाही. त्यांना पर्यायी जागा वा मोबदला द्यावाच लागेल.

Web Title: If it is frustrated, Mehta should contest the election before me, Pratap Sarnaik's reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.