"आमचं सरकार नसतं तर दहिहंडी, गणपती हे सण साजरेच झाले नसते"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 11:14 PM2023-01-26T23:14:53+5:302023-01-26T23:15:59+5:30

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राजस्थानमध्ये मला भरभरून प्रेम मिळालं पण ठाण्यातला कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे

"If it was not for our government, Dahihandi and Ganpati festivals would not have been celebrated", Says Eknath Shinde on mahavikas aghadi | "आमचं सरकार नसतं तर दहिहंडी, गणपती हे सण साजरेच झाले नसते"

"आमचं सरकार नसतं तर दहिहंडी, गणपती हे सण साजरेच झाले नसते"

Next

ठाणे - आमचं सरकार आलं नसत तर सगळं बंद असतं कारण चायनामध्ये कोरोना आला आहे. गोविंदा, गणपती पण झाले नसते. पण, आमचं सरकार आलं म्हणून असे कार्यक्रम होतं आहेत, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकावर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.  

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राजस्थानमध्ये मला भरभरून प्रेम मिळालं पण ठाण्यातला कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. पुढच्या काही काळात बदलेलं ठाणे दिसेल. टप्याटप्याने सर्व काम पूर्ण होतील. भारतातून लोकं ठाणे बघायला येतील असं त्यांनी सांगितले. तसेच, तुमचे आमदार निधी आणायला खूप हुशार आहेत. जेवढी कामे गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहेत, मला वाटतं इतर कुठल्याच मतदारसंघात तेवढी कामे झालेले नाहीत. गुवाहाटीला असताना सगळ्यावर कागदपत्रांवर सह्या करत होतो. सर्वात जास्त निधी प्रताप सरनाईक यांनाच मिळाला आहे. अडीच वर्षे सर्व काही बंद होते, याची आठवणही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी करुन दिली. 
 

Web Title: "If it was not for our government, Dahihandi and Ganpati festivals would not have been celebrated", Says Eknath Shinde on mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.