वैद्यकिय पदांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य न दिल्यास भरती होऊ देणार नाही, नगरसेवकाचे मनपा प्रशासनास आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:00 PM2021-09-17T17:00:07+5:302021-09-17T17:00:59+5:30

Bhiwandi News: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूच्या तिस-या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता महानगरपालिकेत विविध वैद्यकिय पदांची तात्पुरत्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे.

If local candidates are not given priority in recruitment for medical posts, recruitment will not be allowed, corporator challenges municipal administration | वैद्यकिय पदांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य न दिल्यास भरती होऊ देणार नाही, नगरसेवकाचे मनपा प्रशासनास आव्हान  

वैद्यकिय पदांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य न दिल्यास भरती होऊ देणार नाही, नगरसेवकाचे मनपा प्रशासनास आव्हान  

Next

- नितिन पंडीत

भिवंडीभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूच्या तिस-या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता महानगरपालिकेत विविध वैद्यकिय पदांची तात्पुरत्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील जाहिराती व नोटीस मनपा प्रशासनाने प्रसिद्ध केल्या आहेत.  आहे. दरम्यान या भरती प्रक्रियेत शासन नियमानुसार स्थानिक उमेदरवारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अन्यथा हि भरती आपण होऊ देणार नाही अशी सूचना वजा आव्हान नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी मनपा प्रशासनास केले आहे.

महानगरपालिकेत होणा-या वैद्यकिय पदांच्या भरतीमध्ये भिवंडी शहर व भिवंडी तालुकामधील स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना प्रथम रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात द्यावी तसेच भरती करण्यात येणा-या उमेदवारांची यादी स्थायी समितीकडे माहितीसाठी पाठवावी अशा सूचना देखील राऊत यांनी मनपा प्रशासनास दिल्या असून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य न दिल्यास आम्ही आंदोलन करुन सदरची भरती होऊ देणार नाही असा इशारा देखील नगरसेवक अरुण राऊत यांनी भिवंडी मनपा प्रशासनास दिला आहे.

Web Title: If local candidates are not given priority in recruitment for medical posts, recruitment will not be allowed, corporator challenges municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.