ठाणे परिवहन सेवेच्या थांब्यावरील प्रवासी उचलल्यास खाजगी बसेसच्या विरोधात होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:33 PM2017-12-22T14:33:36+5:302017-12-22T14:37:29+5:30

वारंवार पत्रव्यवहार करुन खाजगी बसेसच्या विरोधात पुरावे सादर करुन देखील आरटीओकडून या बसेसवर कारवाईच होत नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रशासनाचे निदर्शनास आणली आहे.

If the passengers of the Thane transport service take the strike, then the cases will be filed against private buses | ठाणे परिवहन सेवेच्या थांब्यावरील प्रवासी उचलल्यास खाजगी बसेसच्या विरोधात होणार गुन्हे दाखल

ठाणे परिवहन सेवेच्या थांब्यावरील प्रवासी उचलल्यास खाजगी बसेसच्या विरोधात होणार गुन्हे दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देबसथांब्यावरील प्रवासी उचलल्यास होणार कारवाईशहरात २३० खाजगी बसेस

ठाणे - तीन महिन्यांपूर्वी शहरात विविध ठिकाणी अवैधरित्या धावणाºया खाजगी बसेसचे छायाचित्र सहपोलीस आयुक्त तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीमध्ये सादर करण्यात आल्यानंतरही या बसेसवर कारवाईच झाली नसल्याची खंत परिवहन प्रशासनाने व्यक्त केली आहे. मात्र तरीही अद्याप खाजगी बसेसची वाहतूक सुरूच असल्याने अखेर यापुढे अशा खाजगी बसेसवर गुन्हा दाखल केल्यानंतर संबधींत पोलीस स्टेशन आरटीओकडे ताशा प्रकारचा अहवाल देतील अशी माहिती परिवहन व्यवस्थापन संदीप माळवी यांनी दिली आहे .
           शुक्र वारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीमध्ये खाजगी बस वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला. परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. परिवहनच्या गेल्या पाच ते सहा बैठकीमध्ये खाजगी बस वाहतुकीवर चर्चा करण्यात आली आहे. विशेष शिंदे यांनी शहरात सध्या किती खाजगी बसेस धावतात याची आकडेवारी देखील मागील परिवहनच्या बैठकीमध्ये सादर केली होती. मात्र अद्याप परिवहन प्रशासनाच्या वतीने कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसून या खाजगी बसेस शहरात सुरूच असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. या खाजगी बसेस केवळ परिवहनचे प्रवासीच उचलत नसून परिवहनच्या बस थांब्याचा देखील वापर करत असल्याचे त्यांनी बैठकीमध्ये सांगितले. जवळपास २३० खाजगी बसेसची शहरात वाहतूक सुरु असून कोणत्याही प्रकारची कारवाई कोणत्याच यंत्रणेकडून होत नसल्याबाबद्दल परिवहन सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाच्या वतीने उत्तर देताना परिवहन अधीक्षक धात्रक यांनी खाजगी बसेस संदर्भात खुलासा केला. खाजगी बसेसच्या संदर्भात वारंवार प्रादेशिक परिवहन विभागाला माहिती दिली जाते. विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वी खाजगी बसेस संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि इतर महत्वाचे अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत शहरात कुठे कुठे खाजगी बसेसची वाहतूक सुरु आहे, कोणत्या रूटवर सुरु आहे याचे छायाचित्र देखील या बैठकीत सादर करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा लवकरच एक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे धात्रक यांनी स्पष्ट केले.
परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी खाजगी बसेसवर वारंवार कारवाई करत असल्याची माहिती दिली. मात्र तरीही बसेस बंद होत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता परिवहनच्या बसथांब्यावरुन प्रवासी उचलण्याचा प्रयत्न झाल्यास, यापुढे अशा खाजगी बसेसवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. गुन्हे दाखल केल्यानंतर काही प्रमाणात अशा खाजगी बसेसवर वचक बसेल असा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे. गुन्हे दाखल केल्यानंतर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्र ार जाणार असल्याने ठोस कारवाई होऊ शकेल अशी अशा परिवहन प्रशासनाला आहे. परिवहन सदस्यांनी देखील याबाबत संमती दर्शवली असून येत्या काही दिवसात अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रि या सुरु करणार असल्याचे माळवी यांनी स्पष्ट केले आहे.



 

Web Title: If the passengers of the Thane transport service take the strike, then the cases will be filed against private buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.