"लोकांनी नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन करावाच लागेल", ठाण्याच्या महापौरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:24 PM2021-03-15T18:24:06+5:302021-03-15T18:24:44+5:30
Coronavirus : मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. परंतु ठाणोकर नागरीक शासनाने किंवा महापालिकेने घातलेले नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे.
ठाणे - मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. परंतु ठाणोकर नागरीक शासनाने किंवा महापालिकेने घातलेले नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकांनी नियम पाळले नाहीत आणि कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसेल असे वक्तव्य महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. (If people don't follow the rules, they will have to lockdown, Thane Mayor Naresh Mhaske)
सोमवारी महापौर म्हस्के यांच्या दालनात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पाश्र्वभूमीवर कशा पध्दतीच्या उपाय योजना करण्यात येत आहेत. कशा प्रकारची तयारी केली आहे, याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. यावेळी कोरोनाशी लढा देण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा कशा पध्दतीने सज्ज आहे, याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
परंतु फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढतांना दिसत आहेत. ठाण्यात आजच्या घडीला रोजच्या रोज 2क्क् ते 3क्क् रुग्ण आढळत आहेत. परंतु त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोवीड सेंटर सज्ज ठेवण्यात आलेली आहेत. अॅम्ब्युलेन्स, औषधांचा साठा, क्वॉरन्टाइन सेंटर देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. परंतु असे असले तरी आजही ठाण्याच्या बाजारपेठा असतील किंवा बसेस असतील किंवा इतर ठिकाणी देखील नागरीकांची गर्दी होतांना दिसत आहे. मास्कचा वापर कमी होतांना दिसत आहे. इतर शहरात देखील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन करायचा नसेल तर नागरीकांनी जबाबदारीने वागणो गरजेचे असल्याचे मत महापौर म्हस्के यांनी व्यक्त केली. त्यांनी मास्कचा वापर केला, गर्दीत जाणो टाळले, शासनाने किंवा महापालिकेने घालून दिलेले नियम पाळले तर लॉकडाऊन घ्यावा लागणार नाही. परंतु नागरीकांनी नियम पाळले नाही आणि कोरोनाचे रुग्ण वाढतच राहिले तर लॉकडाऊन लावण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लकच राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.