‘ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्यास ते पुढे जातील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:10 PM2019-01-30T23:10:00+5:302019-01-30T23:10:13+5:30
तारापूर ऑटोमिककडून शाळेसाठी इमारत उभारणी
डहाणू : विद्यार्थ्यांच्या अंगात असणाऱ्या सुप्त कलागुणांना आणि कौशल्याला वाव देण्याबरोबरच, ग्रामीण भागातील मुले ही गुणवत्तेच्या दृष्टीने हुशार आणि काटक असल्याने त्यांना संधी उपलब्ध करून दिल्यास, ती शहरी विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीने पुढे जातील असे विचार खासदार राजेंद्र गावित यांनी मांडले.
वरोर जि. प. शाळा पावडे पाडा (गांधीधाम) येथे सोमवारी बाडापोखरण केंद्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा, बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, खासदार राजेंद्र गावित आणि आमदार आनंद ठाकूर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, जि.प. सदस्य विनिता कोरे, विपुला सावे, प.स.सदस्य स्वप्नाली राऊत, वशीदास अंभिरे, विनीत पाटील, एस.एस.एल चे प्रकाश राऊत, गटविकास अधिकारी बी.एच भरक्षे, गटशिक्षणाधिकारी विष्णू रावते, जगन्नाथ सावे, सरपंच, जयवंती बरफ, उपसरपंच शितल चौधरी, केंद्रप्रमुख,विजय भाई पाटील, मंगेश चौधरी, तसेच वरोर परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तारापूर एटॉमिक पावर स्टेशन तारापूरने जि प शाळा पावळे पाडा (गांधीधाम) , शाळेची एक कोटी ३६ लाख खर्चाची नवीन इमारत बांधून दिल्याचे सांगण्यात आले.