"लोकप्रतिनिधी नसतील तर प्रश्न सुटणार कसे?; महापालिका निवडणुका लवकर घ्या"

By अजित मांडके | Published: December 14, 2022 01:11 PM2022-12-14T13:11:12+5:302022-12-14T13:11:36+5:30

शहरे बिल्डर चालवतात. मनपा चालवत नाहीत. पालिका निवडणूक लवकर झाल्या पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले.

"If there are no people's representatives, how will the problem be resolved?; Municipal elections should be held early" - MNS Raj Thackeray | "लोकप्रतिनिधी नसतील तर प्रश्न सुटणार कसे?; महापालिका निवडणुका लवकर घ्या"

"लोकप्रतिनिधी नसतील तर प्रश्न सुटणार कसे?; महापालिका निवडणुका लवकर घ्या"

googlenewsNext

ठाणे - शहरातील वाहतूक कोंडी हा न सुटणारा विषय आहे. नगरविकास रचना आराखडा केवळ कागदावरच असते. रस्ते आणि उड्डाणपुल हा वाहतूक कोंडीवर पर्याय नाही. वाहनांची संख्या कमी करणे हा एकमेव पर्याय असून शहरे सुधरायची असतील तर पर्याय फक्त राज ठाकरे आहे असा विश्वास मनसे प्रमुख राज ठाकरेंनी व्यक्त केला. 

ठाण्यातील पत्रकारांसोबत ते अनोपचारिक गप्पा मारत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, निवडणूक पॅनल सिस्टिम योग्य नाही. वॅार्डात काम झाले नाही तर जबाबदार कोणाला धरणार? आधीची सिस्टिम योग्य होती. पॅनल राजकीय पक्षांची सोय असल्याचं सांगत राज यांनी प्रभाग समिती पद्धतीवर टीका केली. 

दरम्यान, शहरे बिल्डर चालवतात. मनपा चालवत नाहीत. पालिका निवडणूक लवकर झाल्या पाहिजेत. कारण लोकांचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी नसतील तर समस्या सुटणार कशा असं सांगत राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली. 
 

Web Title: "If there are no people's representatives, how will the problem be resolved?; Municipal elections should be held early" - MNS Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.