‘वसुली घटल्यास पगार नाही’

By admin | Published: February 28, 2017 03:09 AM2017-02-28T03:09:23+5:302017-02-28T03:34:40+5:30

इष्टांकानुसार वसुली नाही झाली, तर संबंधित अधिकाऱ्यांचे पगार थांबवणार असल्याचे स्पष्ट संकेत सोमवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

'If there is no recovery then there is no salary' | ‘वसुली घटल्यास पगार नाही’

‘वसुली घटल्यास पगार नाही’

Next


ठाणे : दिलेल्या इष्टांकानुसार वसुली नाही झाली, तर संबंधित अधिकाऱ्यांचे पगार थांबवणार असल्याचे स्पष्ट संकेत सोमवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोककुमार रणखांब आदी उपस्थित होते.
सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मालमत्ताकर आणि पाणीकरवसुलीचा आढावा घेतला. या वेळी जयस्वाल यांनी गतसाली झालेल्या एकूण वसुलीच्या तुलनेत या वर्षी विभागनिहाय किती वसुली झाली आहे, याचा ताळेबंद मांडला. तसेच, उर्वरित एका महिन्यात दिलेल्या इष्टांकानुसार वसुली झाली नाही झाली, तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, तसेच वेळ पडल्यास त्या अधिकाऱ्यांचे पगारही थांबवण्यात येतील, असे स्पष्ट केले. दरम्यान, ज्या वाइन शॉपची जकातीची वसुली अद्यापही झालेली नाही, ती वाईन शॉप्स जप्त करा किंवा तत्काळ सील करा, असे आदेश त्यांनी एलबीटी विभागाला दिले आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)

Web Title: 'If there is no recovery then there is no salary'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.