मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन , १४ एप्रिल रोजी होणार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:40 AM2018-03-15T03:40:04+5:302018-03-15T03:40:04+5:30

ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात डिसेंबरमध्ये नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची राज्यस्तरीय जागृती रॅली बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली.

If there is no settlement of demands, the agitation will be held on April 14, similar to farmers | मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन , १४ एप्रिल रोजी होणार समारोप

मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन , १४ एप्रिल रोजी होणार समारोप

googlenewsNext

कल्याण : ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात डिसेंबरमध्ये नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची राज्यस्तरीय जागृती रॅली बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली. या वेळी ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात १४ एप्रिलपर्यंत योग्य तो तोडगा न निघाल्यास शेतकºयांप्रमाणे ओबीसीही आंदोलन छेडतील, असा इशारा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी या वेळी दिला.
१९ डिसेंबरला या जागृती अभियान रॅलीला प्रारंभ झाला आहे. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तिचा समारोप होणार आहे.
कल्याणमार्गे बुधवारी ही रॅली पुढे मार्गस्थ झाली. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, राजेश शिंदे, राजेंद्र नांदोस्कर, प्रसन्न अचलकर, एकनाथ म्हात्रे, निरंजन भोसले व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुधे करत आहेत.
मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावे. ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करून त्यांना केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपये भांडवल द्यावे. उद्योग-व्यवसायासाठी १० लाखांपर्यंत कर्जमर्यादा वाढवावी. क्रिमिलेअरची अट रद्द करावी. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची तातडीने आणि ठोस अंमलबजावणी करा. मंडल कमिशनची १०० टक्के अंमलबजावणी करा. शेतकºयांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करा. त्याचबरोबर शेतकºयांच्या तरुण मुलांना उद्योगासाठी विनाव्याज कर्ज द्या. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे, पण विधानसभा व लोकसभेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. तीन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्री-शिप ताबडतोब अदा करावी. स्पर्धा परीक्षेत महिलांना क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावी तसेच देशात १६०० ओबीसी विद्यार्थी आयएएस झाले आहेत, परंतु नॉन-क्रिमिलेअरच्या अटीमुळे या प्रक्रियेतून त्यांना बाद ठरवले गेले. त्यांना पुन्हा संधी द्यावी, अशा प्रमुख मागण्या ओबीसी सेलच्या असल्याकडे बाळबुधे यांनी या वेळी लक्ष वेधले.
>उल्हासनगरकडे रॅली मार्गस्थ
बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास शीळफाटामार्गे कल्याण ग्रामीण भागात निघालेली ही अभियान रॅली पुढे मानपाडा, गोळवली, कल्याण पूर्वेकडील सूचकनाका, चक्कीनाका, तिसगाव चौक, काटेमानिवली, विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक, वालधुनी उड्डाणपूलमार्गे कल्याण पश्चिमेकडील सुभाष चौक, पौर्णिमा चौक, बिर्ला महाविद्यालय, खडकपाडा चौक, आधारवाडी चौक, लालचौकी, पारनाका, टिळक चौक, महापालिका मुख्यालय, शिवाजी चौक, बाजारपेठमार्गे नेहरू चौक यानंतर महात्मा फुले चौकमार्गे उल्हासनगरकडे या रॅलीचे प्रस्थान झाले.

Web Title: If there is no settlement of demands, the agitation will be held on April 14, similar to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.