मेट्रोसाठी तरतूद न केल्यास आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:42 AM2018-03-29T00:42:18+5:302018-03-29T00:42:18+5:30

मुख्यमंत्र्यांनी मीरा- भार्इंदरच्या नागरिकांना दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचेही खोटेच ठरले आहे

 If you do not make provision for Metro, then do the agitation | मेट्रोसाठी तरतूद न केल्यास आंदोलन करू

मेट्रोसाठी तरतूद न केल्यास आंदोलन करू

Next

मीरा रोड : मुख्यमंत्र्यांनी मीरा- भार्इंदरच्या नागरिकांना दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचेही खोटेच ठरले आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असूनही एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी तरतूदच न करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. १५ दिवसात मेट्रोसाठी तरतूद न केल्यास आंदोलन करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अनिल सावंत यांनी म्हटले आहे की , पालिका निवडणूक व त्याआधीपासूनच शहरात सतत येत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनांपैकी एक मेट्रोचे होते. स्थानिक आमदारांनी नागरिकांकडून मेट्रोच्या प्रतिकृती स्वीकारल्या, सुखकर रेल्वे प्रवासाची स्वप्ने दाखवली. मेट्रो स्टेशनची नावेही पक्की केली.
वास्तविक मीरा- भार्इंदर व पुढे वसई, विरार हे मेट्रोने जोडावे अशी मागणी त्यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केली
होती.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही मीरा-भार्इंदरचा मेट्रोमध्ये समावेश केला होता. पण याच भाजपा सरकारने मेट्रो रद्द केली असा आरोप सावंत यांनी केला.
मेट्रोच्या मागणीसाठी काँंग्रेसने नागरिकांसह शहरात आंदोलन केले. सह्यांची मोहीम राबवली. भाजपा मुख्यमंत्र्यांना मीरा- भार्इंदरचा मेट्रोमध्ये समावेश करण्यास भाग पाडले.
परंतु आता एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तरतूद न करून नागरिकांच्या जखमेवर मुख्यमंत्री व स्थानिक नेत्याने मीठच चोळले
आहे.

Web Title:  If you do not make provision for Metro, then do the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.