पाणी मिळाले नाही तर लॉकडाऊनमध्येही मोर्चाला सामोरे जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:26+5:302021-05-11T04:42:26+5:30

अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा, कोहोजगाव, कमलाकरनगर, विठ्ठल मंदिर परिसर, चिंचपाडा, शास्त्रीनगर नालंदानगर, डीएमसीचाळ आदी भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली ...

If you don't get water, face the front even in lockdown | पाणी मिळाले नाही तर लॉकडाऊनमध्येही मोर्चाला सामोरे जा

पाणी मिळाले नाही तर लॉकडाऊनमध्येही मोर्चाला सामोरे जा

Next

अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा, कोहोजगाव, कमलाकरनगर, विठ्ठल मंदिर परिसर, चिंचपाडा, शास्त्रीनगर नालंदानगर, डीएमसीचाळ आदी भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यात एखाद दिवस पाणी न आल्यास तीन दिवस पाण्याविना राहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने जीवन प्राधिकरणाने पाण्याचे नियोजन करीत असताना, सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हे करीत असताना नागरिकांना योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल, असा विश्वास देखील निर्माण केला होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून अनेक ठिकाणी तीन ते चार दिवस तो होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरात भीषण पाणीटंचाई असतानादेखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत होती. अखेर संताप अनावर झाल्याने नागरिकांनी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. या मोर्चाचे नियोजन सुरू असतानाच अंबरनाथ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून लॉकडाऊनच्या काळात मोर्चा काढू नये, अशी विनंती काँग्रेस पक्षाला केली.

पाणीसमस्या चर्चेने सोडवण्यासाठी अंबरनाथ पोलीस ठाण्यात सोमवारी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रदीप पाटील यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी येत्या तीन दिवसात पाणी प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले. पोलिसांच्या मध्यस्थीने काँग्रेसचा मोर्चा स्थगित केला असून येत्या तीन दिवसांत ही समस्या न सुटल्यास लॉकडाऊनमध्येदेखील जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढू, असा स्पष्ट इशारा दिला.

Web Title: If you don't get water, face the front even in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.