मतदान केंद्राबाहेरील फलकांकडे मतदारांचे दुर्लक्ष
By admin | Published: February 22, 2017 06:18 AM2017-02-22T06:18:12+5:302017-02-22T06:18:12+5:30
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांबाबतची इत्यंभूत माहिती मतदारांना कळावी, यासाठी
मुंब्रा : निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांबाबतची इत्यंभूत माहिती मतदारांना कळावी, यासाठी उमेदवारांनी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात सादर केलेली माहिती त्या-त्या प्रभागातील मतदान केंद्रावर लावण्यात आली होती. परंतु, त्या फलकांकडे 99%मतदारांनी ढुकूंनही बघीतले नाही. फलकावरील रकाने कसले आहेत, याचा काही फलकांवर उल्लेख केला नव्हता. यामुळे त्यावरील आकडे नेमके कशाचे आहेत याचा नेमका उलगडा होत नसल्यालामुळे फलक वाचताना मतदार संभ्रमित होत होते, अशी माहिती मोहम्मद शिब्बर तोफाफरोश उर्फ सरबतवाला या मतदाराने लोकमतला दिली.
सोमवारी रात्री मुंब्य्रात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
सोमवारी रात्री मतदारांना कथित पैसे वाटण्याच्या वादातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. यामुळे सोमवारी मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास मुंब्य्रातील वातावरण तंग झाले होते.
प्रभाग क्रमांक २६ मधील ठाकूरपाडा परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार राजन कि णे हे त्यांच्या समर्थकांसह पैसे वाटत असल्याची कुणकुण लागल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सुधीर भगत हे आपल्या समर्थकांसह त्यांच्यामागे गेले. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत गणेश भोईर, आलम आणि अनिल सुकाळे जखमी झाले.
याप्रकारामुळे संतप्त झालेल्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आमदार सुभाष भोईर आणि जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात हजर झाले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी लोकमतला दिली. (वार्ताहर)