फुटले 'बेकायदा दत्तक'चे बिंग

By सुरेश लोखंडे | Updated: March 2, 2025 12:25 IST2025-03-02T12:24:45+5:302025-03-02T12:25:03+5:30

बालिकेला एचआयव्ही असल्याने प्रकार उघड, वाडिया रुग्णालयात उपचार

illegal adoption scandal breaks out | फुटले 'बेकायदा दत्तक'चे बिंग

फुटले 'बेकायदा दत्तक'चे बिंग

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : माहिरा रेहमत अली शेख (वय चार महिने) ही बालिका महिन्यापासून सतत आजारी पडू लागली. त्यामुळे तिला अखेर परेल येथील 'बाई जेरबाई वाडिया' रुग्णालयात दाखल केले. माहिराचे अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी केलेल्या चाचण्यांत ती एचआयव्ही बाधित असल्याचे उघड झाले. त्यामुळे आईवरही एचआयव्हीचे उपचार करायचे, म्हणून तिची आई असल्याचा दावा करणाऱ्या शरीफा शेख (नावात बदल, वय ३५) हिला डॉक्टरांनी बोलावले असता, आजारी माहिराला तिची जन्मदात्री अलका यादव (नावात बदल, वय ३५) हिला डॉक्टरांनी बोलावले असता, आजारी माहिराला तिची जन्मदात्री अलका यादव (नावात बदल, वय ३८) हिने बेकायदा दत्तक दिल्याचे बिंग फुटले. याप्रकरणी दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल झाला असून, जन्मदात्रीचा पोलिस शोध घेत आहेत. माहिराला सध्या पोलिसांनी बालगृहात ठेवले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आडवली ढोकाळी येथील ही बेकायदा मुलगी दत्तक देण्याची घटना ठाणे जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या चाइल्ड हेल्पलाइन केंद्राच्या समन्वयक, समुपदेशन, तक्रार निवारण कार्यालयाने चौकशीनंतर उघडकीस आणून मानपाडा पोलिसांत गुन्हा नोंद केला. हा गुन्हा आता भोईवाडा पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.

वाडिया रुग्णालयाने महिला बालविकास कार्यालयास घटनेची माहिती दिली. त्यानंतर चौकशीचे चक्रे फिरून बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५च्या कलमान्वये दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना उघड होताच माहिराची जन्मदात्री भाड्याचे घर सोडून पळून गेली. पोलिस अलकाचा शोध घेत आहेत.

शस्त्रक्रियेसाठी चाचणी

जन्मानंतर माहिरा वरचेवर आजारी पडू लागली. अशक्त झाली. तिला मुंबईतील वाडिया रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली. त्याकरिता विविध चाचण्या केल्या. त्यात ती एचआयव्ही बाधित असल्याचे उघड झाले. डॉक्टरांनी माहिरावर व तिच्या आईवरही एचआयव्ही उपचार करावे लागतील, असे सांगताच शरीफा घाबरली. माहिराला बेकायदेशीर दत्तक घेतल्याची कबुली दिली.

अशी केली नावाची नोंद

माहिराची आई अलका आणि तिला बेकायदेशीर दत्तक घेणारी शरीफा या दोघी आडवली ढोकाळी येथील रहिवासी आहेत. शरीफाच्या घराजवळच अलका भाड्याच्या घरात राहतात. त्या सहा महिन्यांच्या गरोदर होत्या. पती दारूडा असल्यामुळे त्यांना हे बाळ नको होते. त्यामुळे दोघींनी शरीफा यांना जन्मल्यावर बाळ सांभाळण्यास देण्याचे ठरवले. प्रसूतीसाठी अलका केईएम रुग्णालयात दाखल झाली. अलका यांनी शरीफा यांचे आधार कार्ड वापरून बालिकेचे नाव माहिरा शेख असे नोंद करून घेतली.

Web Title: illegal adoption scandal breaks out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे