अवैध बांधकामांवर उल्हासनगरात हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:45 AM2017-08-01T02:45:55+5:302017-08-01T02:45:55+5:30
शहरातील कॅम्प नं. पाचमधील टँकर पाँर्इंट, कानसई रोड व गजानननगर येथील अवैध बांधकामावर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी व मनीष हिवरे यांच्या पथकाने कारवाई केली.
उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. पाचमधील टँकर पाँर्इंट, कानसई रोड व गजानननगर येथील अवैध बांधकामावर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी व मनीष हिवरे यांच्या पथकाने कारवाई केली. त्याचबरोबर अवैध बांधकामाचे फोटो, पत्ता पाठविण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले.
हजारो अवैध बांधकामे उभी राहिल्यानंतर पालिकेला जाग आली आहे. आता त्याचे फोटो व पत्ता पाठवण्याचे आवाहन पालिकेने केल्याने अशी बांधकामे अस्तित्त्वात असल्यावर शिक्कामोर्तब झाले. पालिका निवडणुकीदरम्यान व त्यानंतरच्या अवैध बांधकामाची चर्चा जोरात सुरू होती. मात्र प्रभाग क्रमांक एक आणि दोनच्या परिसरात शेकडो अवैध बांधकामे उभी राहूनही कारवाई न झाल्याची टीका सहा. आयुक्तांवर सुरू होती. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या नागरिकांच्या भेटीत हा विषय आल्याने कारवाई सुरू झाली.