बेकायदा इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांवर मीरा भार्इंदर मध्ये छापासत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 11:10 PM2018-07-02T23:10:05+5:302018-07-02T23:10:24+5:30
शासनाचा महसुल बुडवुन बेकायदेशीरपणे इंटरनेट सेवा पुरवणारया भार्इंदर पुर्व येथील एका कार्यालयावर दुरसंचार विभागाच्या अधिकारयांसह पोलिसांनी छापा मारुन गुन्हा दाखल केलाय.
मीरारोड - शासनाचा महसुल बुडवुन बेकायदेशीरपणे इंटरनेट सेवा पुरवणारया भार्इंदर पुर्व येथील एका कार्यालयावर दुरसंचार विभागाच्या अधिकारयांसह पोलिसांनी छापा मारुन गुन्हा दाखल केलाय. कार्यालयातील डाटा, पावत्या आदी जप्त करुन कार्यालयाला सील ठोक ण्यात आले आहे. शिवाय काशिमीरा, नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील पोलीसांनी छापे टाकले आहेत. या बेकायदा इंटरनेट सेवे मुळे राष्ट्रिय सुरक्षेला धोका होण्याची भिती दुरसंचार विभागाच्या अधिकारयाने व्यक्त केली आहे. तर २०१६ पासुन शाहरात अनेक ठिकाणी बेकायदा इंटरनेट सेवा चालवल्या जात असल्याच्या तक्रारी असताना वेळीच कारवाई न केल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कार्यालया कडुन या बाबतचे प्रसिध्दी पत्रक देण्यात आले आहे. मीरा भार्इंदर मध्ये दुरसंचार विभागाशी कोणताही रीतसर करारनामा न करता व परवानगी न घेताच इंटरनेट सुविधा पुरवली जात असल्याची माहिती केंद्रिय दुरसंचार विभागाचे दिल्ली येथील महासंचालक सुनिल कुमार यांच्या कडुन ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांना देण्यात आली होती.
त्या अनुषंगाने पाटील यांच्या कार्यालयात या बाबत सुनिल कुमार यांच्यासह ब्रिजेश कुमार, संतोषी कुलकर्णी या दुरसंचार विभागातील अधिकारयांसह अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत कदम , सहाय्यक अधिक्षक कुलकर्णी यांची बैठक झाली होती.
बैठकीत ठरल्या प्रमाणे कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नया नगर , नवघर व काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी तीन पथके तयार करण्यात आली होती.
सदर पथकाने भार्इंदर पुर्वेच्या आरएनपी पार्क मधील शिवनिकेतन इमारतीत असलेल्या स्टार नेट इंटरनेट ब्रॉड बँड या बेकायदा इंटरनेट पुरवणारया कार्यालयावर छापा टाकला. सदर ठिकाणा वरुन संगणकातील डाटा, पावती पुस्तके, नोंद वह्या आदी जप्त करुन कार्यालय सील केले. २०१६ पासुन भाऊसाहेब कारभारी उगले व वोरटेक्स नेटच्या मालकाने संगनमताने भारतिय दुरसंचार कायद्याचे उल्लंघन करुन ग्राहकांची दिशाभुल करत बेकायदा इंटरनेट सेवा पुरवुन बक्कळ पैसे उकळले आहेत.
शासनाशी कोणताही करारनामा वा परवानगी न घेता इंटरनेट पुरवण्याची यंत्रणा उभारली आहे. यातुन शासनाचा महसुल बुडवला आहेच शिवाय राष्ट्रिय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचे म्हटले आहे. कारण बेकायदा इंटरनेट पुरवणारया यंत्रणे मुळे नेट वापरणारया नागरीकांचा डाटा व माहिती देखील धोक्यात आली असुन देश विरोधी कृत्यासाठी सुध्दा याचा सहज वापर शक्य आहे.
या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास सुरु आहे. शहरात अन्य ठिकाणी देखील अशाा बेकायदा इंटरनेट सेवा पुरवणारे कार्यरत असुन त्यांच्यावर देखील छापासत्र सुरु असल्याचे पोलीसांनी सांगीतले.