डॉ. कलामांच्या घरी कल्पकता केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:28 AM2017-07-27T00:28:42+5:302017-07-27T00:28:45+5:30

ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरच्या वतीने दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम येथील निवासस्थानी आणि त्यांच्या शाळेत डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे.

Imagination center in Apj Abdul kalam house | डॉ. कलामांच्या घरी कल्पकता केंद्र

डॉ. कलामांच्या घरी कल्पकता केंद्र

Next

ठाणे : ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरच्या वतीने दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम येथील निवासस्थानी आणि त्यांच्या शाळेत डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. डॉ. कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाकरिता पुढाकार घेण्यात आला आहे. यापूर्वी ठाण्यातील कचराळी तलाव येथे गेल्या गतवर्षी डॉ. कलाम कल्पकता केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या केंद्राची माहिती मिळाल्यावर त्याची पाहणी करण्यासाठी डॉ. कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वैज्ञानिकांनी या केंद्राला भेट दिली. कसलेही स्मारक किंवा पुतळा न उभारता कल्पकता केंद्राच्या माध्यमातून डॉ. कलामांना वाहिलेली श्रद्धांजली ही संकल्पना त्यांना खूप आवडली आणि अशाच प्रकारचे केंद्र रामेश्वरम येथे कलमांच्या घरी आणि शाळेत उभारावे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर, दोन महिन्यांत मिलिंद चौधरी आणि पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या प्रयत्नाने केंद्राची निर्मिती करण्यात आली. ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती यांचे घर पाहण्याकरिता देशभरातील शालेय विद्यार्थी रामेश्वरमला येतात. त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संकल्पना अनुभवता याव्यात, यासाठी कल्पकता केंद्राचा उपयोग होईल, असे पाचपांडे यांनी सांगितले. या केंद्राच्या माध्यमातून चौथी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन तास विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स अशा विविध विषयांतील तीन हजारांहून अधिक प्रयोग स्वत:च्या हाताने करण्याची संधी उपलब्ध होत आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी केलेले काही प्रयोग हे त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायला मिळतात.

Web Title: Imagination center in Apj Abdul kalam house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.