कोरोनाच्या कामातून शिक्षकांना तत्काळ सेवामुक्त करा, आमदार पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 04:18 PM2020-07-17T16:18:49+5:302020-07-17T16:22:41+5:30

उल्हासनगर महापालिका प्रमाणे ठाणे, पनवेल, कल्याण - डोंबिवली महापालिका क्षैत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना पालिका सेवेत तात्पुरते वर्ग केले.

Immediate retirement of teachers from Corona's work, MLA Bala Ram Patil | कोरोनाच्या कामातून शिक्षकांना तत्काळ सेवामुक्त करा, आमदार पाटलांची मागणी

कोरोनाच्या कामातून शिक्षकांना तत्काळ सेवामुक्त करा, आमदार पाटलांची मागणी

Next
ठळक मुद्देउल्हासनगर महापालिका प्रमाणे ठाणे, पनवेल, कल्याण - डोंबिवली महापालिका क्षैत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना पालिका सेवेत तात्पुरते वर्ग केलेमहापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी शिक्षकांना कोविड कामातून मुक्त करा, असा आदेश महापालिका राज्य शासनाचा आल्याची माहिती त्यांनी दिली.

उल्हासनगर : घरोघरी जावून कोरोनाचे सर्वेक्षण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना पालिका सेवेतून तत्काळ कार्यमुक्त करा. असे पत्र शिक्षकआमदार बाळाराम पाटील यांनी महापालिका आयुक्त व शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांना दिले असून २४ जून रोजीचा राज्य शासन आदेश असल्याची माहिती शिक्षक आमदार पाटील यांनी दिली आहे.

उल्हासनगर महापालिका प्रमाणे ठाणे, पनवेल, कल्याण - डोंबिवली महापालिका क्षैत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना पालिका सेवेत तात्पुरते वर्ग केले. उल्हासनगर महापालिकेने मनपा शाळेतील शिक्षकांसह अनुदानित खाजगी शाळेतील २०० पेक्षा शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाचे काम दिले. शिक्षक घरोघरी जावून सर्वेक्षण करीत असून त्यांनी कोरोना लागण होण्याची भीती व्यक्त केली. दरम्यानच्या काळात काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून जिल्ह्यात ३ ते ४ शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मदने यांनी दिली. २४ जून रोजी राज्य शासनाने आदेश काढून शिक्षकांना कोरोनाच्या कामातून कार्यमुक्त करा. असा आदेश काढला. असे बाळाराम पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. 

महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी शिक्षकांना कोविड कामातून मुक्त करा, असा आदेश महापालिका राज्य शासनाचा आल्याची माहिती त्यांनी दिली. तशी कल्पना महापालिका आयुक्तांना दिली होती. मात्र महापालिकाकडे कर्मचाऱ्याची संख्या कमी असल्याने कामगार उपलब्ध होताच टप्पा टप्प्याने शिक्षकाना सेवा मुक्त करणार आल्याची माहिती मोहिते यांनी दिली आहे. महापालिका व शासनाच्या निर्णयामुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून मुलांचे ऑनलाईन वर्ग सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार बाळाराम जाधव यांनी दिली.

Web Title: Immediate retirement of teachers from Corona's work, MLA Bala Ram Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.