रुग्णांनी कोविड वॉररुमशी संपर्क साधल्यास तत्काळ सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:02+5:302021-04-01T04:42:02+5:30
ठाणे: ठाणे महापालिकेचा कोविड वॉररुम अद्ययावत असून रुग्णांनी संपर्क साधल्यास तत्काळ सेवा पुरविली जाते, परंतु रुग्णांनी या वॉर रुमपर्यंत ...
ठाणे: ठाणे महापालिकेचा कोविड वॉररुम अद्ययावत असून रुग्णांनी संपर्क साधल्यास तत्काळ सेवा पुरविली जाते, परंतु रुग्णांनी या वॉर रुमपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेमध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केले. रात्री आठ वाजल्यानंतर लागू असलेल्या जमावबंदीचे कठोरपणे पालन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिकेमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या एका विशेष बैठकीमध्ये महापौर बोलत होते. ज्या विभागात रुग्ण सापडत आहेत, तेथील नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी होर्डिंग्ज लावणे, कोरोनाबाधित रुग्णांना मदत व्हावी यासाठी शहरातील होर्डिंग्जवर कोविड वॉर रुमचे दूरध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्याचे आवाहन केले जावे. अत्यंत चांगल्या प्रकारे ठाणे महापालिका हद्दीत लसीकरण मोहीम चालू आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, प्रभागनिहाय सर्वच लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे काम करीत असून यापुढे देखील समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना त्वरित उपलब्ध होईल या दृष्टीने स्वतंत्र डेस्क तयार करण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचित केले.
.........
वाचली