कोरोनामुळे पालक दगावलेल्या ९८८ बालकांचे तत्काळ पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:32+5:302021-07-02T04:27:32+5:30

ठाणे : कोरोनाच्या या महामारीत ठाणे जिल्ह्यातील ९८८ बालकांचे व युवा-युवतींच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. पालकांचे छायाछत्र हरवलेल्या या ...

Immediately rehabilitate 988 children whose parents were cheated by Corona | कोरोनामुळे पालक दगावलेल्या ९८८ बालकांचे तत्काळ पुनर्वसन करा

कोरोनामुळे पालक दगावलेल्या ९८८ बालकांचे तत्काळ पुनर्वसन करा

Next

ठाणे : कोरोनाच्या या महामारीत ठाणे जिल्ह्यातील ९८८ बालकांचे व युवा-युवतींच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. पालकांचे छायाछत्र हरवलेल्या या बालकांचे सुयोग्य पालनपोषण व पुनर्वसन करण्याच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कृती दलाच्या बैठकीत गुरुवारी दिल्या. येथील समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली.

या महामारीत जिल्ह्यातील १८ वर्षे वयाखालील एक पालक गमावलेली बालके ९५९ आहेत. तर १८ वर्षे वयाखालील आई व वडील असे दोन्ही दगावलेले बालके २९ आहेत. यामध्ये १८ वर्षे वयावरील व २३ वर्षे आतील १५ बालके आहेत. याशिवाय विधवा महिला ६६९ आहेत. आदींच्या हिताच्या दृष्टीने व पुनर्वसन करण्यासाठी या बैठकीत उहापोह करण्यात आला.

जिल्ह्यातील २९ बालकांचे आईवडील असे दोन्ही पालक कोरोना विषाणूमुळे मयत झाले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या वयाच्या २१ ‌वर्षांनंतर व्याजासह पाच लाख रुपये अनुदानासाठी पात्र ठरली आहेत. तर ९५९ बालके एक हजार १२५ रुपये बालसंगोपन योजनेसाठी पात्र ठरलेली आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ६६९ विधवा महिला पात्र आहेत. यावेळी एनजीओद्वारे शालेय मदतीसाठी ४७ बालकांची यादी प्राप्त झाली आहे.

विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आदेश नार्वेकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिले. शिक्षण अधिकारी यांनी कोविड कालावधीमध्ये ज्यांचे पालक मृत्यू झाले आहेत, अशा बालकांच्या शालेय शुल्कासाठी मदत करण्यासाठी आवश्यक ती माहिती देण्याच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.

Web Title: Immediately rehabilitate 988 children whose parents were cheated by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.