अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स तातडीने निष्कासित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:45+5:302021-06-04T04:30:45+5:30

ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तातडीने निष्कासित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन ...

Immediately remove high-risk buildings, unauthorized hoardings, banners | अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स तातडीने निष्कासित करा

अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स तातडीने निष्कासित करा

Next

ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तातडीने निष्कासित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांना गुरुवारी दिले. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे भुस्खलन होणाऱ्या ठिकाणांच्या नागरिकांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करून त्यांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

शहरात पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी गुरुवारी आयुक्तांनी प्रभाग समितीनिहाय धोकादायक, अतिधोकादायक इमारती, नालेसफाई, भूस्खलन होणारी ठिकाणी तसेच पावसाळ्यासंबंधित इतर बाबींचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपआयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी आदी उपस्थित होते. प्रभाग समितीनिहाय अतिधोकादायक, धोकादायक इमारतींबाबत केलेल्या कारवाईचा आढावा घेत उर्वरित अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून तत्काळ पाडण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. पावसाळ्यातदेखील या सर्व इमारतींची पाहणी करून कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. महापालिका क्षेत्रात मुंब्रा, कळवा, माजिवडा, मानपाडा तसेच इतर ठिकाणी पावसाळ्यात भुस्खलन झाल्यास तेथील नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी, तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवून स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक तसेच नागरिकांना याची माहिती देण्याच्या सूचना करून, अतिवृष्टीच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेऊन संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

Web Title: Immediately remove high-risk buildings, unauthorized hoardings, banners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.