मीरा-भाईंदरमध्ये दीड दिवसाच्या ६७६३ गणेशमूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:40 AM2021-09-13T04:40:01+5:302021-09-13T04:40:01+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये दीड दिवसाच्या ६ हजार ७६३ गणेशमूर्तींचे शनिवारी विसर्जन शांततेत पार पडले. यापैकी कृत्रिम तलावांत ...
मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये दीड दिवसाच्या ६ हजार ७६३ गणेशमूर्तींचे शनिवारी विसर्जन शांततेत पार पडले. यापैकी कृत्रिम तलावांत केवळ ५७४ मूर्तींचे विसर्जन झाल्याने महापालिकेकडून कृत्रिम तलावाची संख्या वाढविण्यासह जनजागृतीकडे लक्ष देण्याची गरज अधाेरेखित झाली आहे.
महापालिकेने रविवारी सायंकाळी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाची आकडेवारी दिली. त्यात तलाव, खाडी व समुद्रात विसर्जन केलेल्या मूर्तींंची संख्या ६ हजार २१६ इतकी आहे. चार कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाची संख्या केवळ ५४७ इतकी आहे. शनिवारी एकूण ६ हजार ७६३ गणेश मूर्तींचे विसर्जन केले गेले.
कोरोना नियमांचे बंधन झुगारून विनामास्क लोक विसर्जनासाठी जाताना अनेक ठिकाणी आढळले. शिवार उद्यान येथील पालिका तलावात नगरसेवक संजय थेराडे यांना तराफावरून नेण्यात येऊन मूर्ती विसर्जन करू दिल्याने सामान्य भाविकांनी संताप व्यक्त केला.