जलवाहतूक प्रकल्पांसह समूह विकास, पाणी योजना मार्गी लावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 06:34 AM2020-03-04T06:34:35+5:302020-03-04T06:34:42+5:30
विधानभवनात पदाधिकारी व प्रशासनाची झाडाझडती घेऊन अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांसह उन्नत रस्ते, समूह पुनर्विकास योजना,पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले.
ठाणे : जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, आरोग्य, नगरविकास, जलसिंचन, मेट्रो आदी कामांचा आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानभवनात पदाधिकारी व प्रशासनाची झाडाझडती घेऊन अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांसह उन्नत रस्ते, समूह पुनर्विकास योजना,पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या जिल्हा आढावा बैठकीला नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. यावेळी आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावेळी आपापल्या समस्यांचा पाढा वाचला. यामध्ये मीरा-भार्इंदर शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन
चेना नदीचे पाणी अडवून शहराला मिळावे यासाठी मागणीवरही यावेळी चर्चा झाली. या अनुषंगाने अभ्यास करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. घोडबंदर, मीरा - भार्इंदर खाडीकिनारा (वॉटरफ्रन्ट)विकास, अंतर्गत जलवाहतुकीसाठी जेटींचा विकास, ठाणे शहरामधील कोस्टल रोड, उन्नत रस्ते, झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन, समूह पुनर्विकास आदीं
विषयांवर या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने चचा केली. सफाईकामगारांच्या पाल्यांना नोकरीमध्ये कायम ठेवण्याची
मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्यावरही यावेळी चर्चा झाली. अंबरनाथ- बदलापूर पाणीपुरवठा योजनेवर महिन्याभरात तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करावित असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. ‘वालधुनी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा’ माळशेज घाट येथे उत्कृष्ट असा काचेचा स्कायवॉक विकसित करण्याचा प्रस्ताव असून पर्यटनाच्या दृष्टीने देशातील हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. उल्हासनगर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असतानाही वालधुनी नदीमध्ये कंपन्यांकडून प्रक्रि या न केलेले सांडपाणी सोडले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित झाल्यामुळे तपासणी
अंती कारवाईचे संकेतही देण्यात आले. शहापूरच्या पाणीयोजना तातडीने पूर्ण करा शहापूरला बाहुली प्रकल्पाचे पाणी गुरु त्व पद्धतीने मिळावे, यासाठी कार्यवाही करावी. तसेच घाटनदेवी पाणी योजनेसाठी सर्वेक्षण करावे, असेही निर्देश
यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.