१ नोव्हेंबरपासून १६ जादा लोकल, मध्य रेल्वेची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:47 AM2017-10-11T02:47:38+5:302017-10-11T02:48:09+5:30
पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेºया सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव
डोंबिवली : पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फे-या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फे-या सुरू होणार असून त्या सर्व ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत. या फे-यांबाबत रेल्वेने आधीच कल्पना दिली होती. आता त्यांची अंमलबजावणी होणार आहे.
दादर-बदलापूर (एक जाणारी-एक येणारी फेरी), दादर-टिटवाळा (एक जाणारी-एक येणारी फेरी), दादर-डोंबिवली (तीन जाणा-या-तीन येणाºया फेºया) आणि कुर्ला-कल्याण (तीन जाणा-या-तीन येणा-या फे-या) असा त्यांचा तपशील आहे. या वाढीव गाड्यांमध्ये महिलांसाठी तीन जादा डबे राखीव असतील.
दरम्यान, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या घेतलेल्या भेटीत अंबरनाथ स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय झाला. सध्याच्या एक नंबरच्या प्लॅटफॉर्मला होम प्लॅटफॉर्म, चार सरकते जिने, नवा पादचारी पूल आणि रेल्वेची नवी इमारत यांचा त्यात समावेश आहे.
तेथील मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचाही विस्तार करण्यात येणार आहे. होम प्लॅटफॉर्मचा विषय मुंबई वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसºया टप्प्यात समाविष्ट असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. त्याला जागतिक बँकेची मंजुरी लवकरच अपेक्षित आहे. ती मिळाली, की दोन महिन्यात निविदा काढल्या जातील, असे ते म्हणाले. स्थानकाच्या मध्यभागी होणारा पादचारी पूल सहा मीटर रूंद असेल. त्यामुळे कर्जत दिशेकडील पुलावरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. या नव्या पुलाला तीन सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. कर्जत दिशेकडील जुन्या पादचारी पुलाला प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सरकता जिना लावण्यात येणार आहे. स्थानकाची सध्याची प्रशासकीय इमारत पाडून त्याजागी दोन मजली इमारत बांधण्यात येणार आहे.