पाकिस्तानातून कांद्याची आयात; जितेंद्र आव्हाड यांनी दिला पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:44 PM2019-09-25T14:44:43+5:302019-09-25T14:47:30+5:30
पाकिस्तानावर टीका करुन महाराष्ट्राची निवडणूक लढवणार्या भाजप सरकारने कांद्याची आयात पाकिस्तानातून केली असल्याचे समोर आले आहे.
ठाणे: पाकिस्तानावर टीका करुन महाराष्ट्राची निवडणूक लढवणार्या भाजप सरकारने कांद्याची आयात पाकिस्तानातून केली असल्याचे समोर आले आहे. भाजप सरकारने पाकिस्तानातून कांदा आयात केला असल्याचा पुरावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर द्वारे शेअर केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वि्ट करत सांगितले की, कांदा पाकिस्तानातून आणणार आणि महाराष्ट्राची निवडणुक पाकिस्तानला केंद्रबिंदू ठेवून लढवणार मस्त आहे, महाराष्ट्रातले लोकं येडे आहेत असं वाटतं यांना अशी भाजपवर टीका करत पाकिस्तानातून आयात केल्याला पुराव्याचा फोटो शेअर केला आहे.
हा घ्या पुरावा कांदा #पाकिस्तान मधून आणणार
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 25, 2019
आणि महाराष्ट्राची निवडणूक पाकिस्तान ला केंद्रबिंदु ठेवून लढवणार
मस्त आहे ना
येडे आहेत महाराष्ट्रातले असे वाटते ह्या #BJP
ला pic.twitter.com/t4jWMPrm0b
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटसोबत एमएमडीसी लिमिटेडचे आयात निविदेचे चलनही जोडले आहे. यामध्ये 6 सप्टेंबर रोजी ही कांद्याची मागणी करण्यात आलेली असून हे 2000 मेट्रीक टन कांदे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतात दाखल होणार आहेत, असे या चलन पावतीमध्ये नमूद करण्यात आले आहे.