मध्यवर्ती रुग्णालयात महिलेच्या पोटातून निघाली अड्डीच किलोची गाठ

By सदानंद नाईक | Published: May 17, 2024 06:21 PM2024-05-17T18:21:38+5:302024-05-17T18:22:41+5:30

१५ दिवसात डॉक्टरांनी केल्या अश्या ६ शस्त्रक्रिया

In a central hospital, a tumor of about 1 kg came out of the woman's stomach | मध्यवर्ती रुग्णालयात महिलेच्या पोटातून निघाली अड्डीच किलोची गाठ

मध्यवर्ती रुग्णालयात महिलेच्या पोटातून निघाली अड्डीच किलोची गाठ

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरवारी तृप्ती नावाच्या महिलेच्या पोटातून तब्बल अद्दीच किलो वजनाचा गोळा शस्त्रक्रियाद्वारे काढून जीवदान दिले. गेल्या १५ दिवसात अश्या ६ शस्त्रक्रिया केल्याची माहिती डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, बदलापूर, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ व ग्रामीण परीसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. तसेच लहान-मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालयात दररोज होत असतात. पोटात दुखत असल्याने तृप्ती नावाची महिला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी आल्यावर, तीची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीत पोटात मोठी गाठ आढळल्यावर रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या पथकाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गुरवारी शस्त्रक्रिया करून पोटातून तब्बल अड्डीच किलो वजनाचा गोळा काढून महिलेला जीवदान देण्यात आले. महिलेची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. अश्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया गेल्या १५ दिवसात ६ महिल्यांची केल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली आहे. 

मध्यवर्ती रुग्णालयात सर्वसामान्य व गोरगरीब नागरिक उपचार घेत असून डॉक्टरांची टीम अश्या शस्त्रक्रिया करून आपले वैधकीय कर्तव्य पार पाडत आहेत. गंभीर झालेल्या रुग्णांनाही वैधकीय सेवा देऊन, मुंबई सारख्या ठिकाणीं रुग्णांना पाठविण्याच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. नागरिकांनी मध्यवर्ती रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधा घ्याव्या. असे आवाहनही त्यानी केले. गेल्या १५ दिवसात एकून ६ महिलेच्या पोटातून असे मोठे गोळे यशस्वीपणे काढल्याने, रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स व इतर टीमचे डॉ बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: In a central hospital, a tumor of about 1 kg came out of the woman's stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.