ठाण्यात राष्ट्रवादीला 'दे धक्का', जिल्हाध्यक्ष म्हात्रेंचा ई-मेलवरुन राजीनामा

By नितीन पंडित | Published: October 4, 2022 02:50 PM2022-10-04T14:50:01+5:302022-10-04T14:50:50+5:30

म्हात्रे यांच्या राजीनाम्याने ठाणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मोठी हानी होणार आहे.

In a shock to the NCP in Thane, Suresh Mhatre resigned from the post of District President | ठाण्यात राष्ट्रवादीला 'दे धक्का', जिल्हाध्यक्ष म्हात्रेंचा ई-मेलवरुन राजीनामा

ठाण्यात राष्ट्रवादीला 'दे धक्का', जिल्हाध्यक्ष म्हात्रेंचा ई-मेलवरुन राजीनामा

googlenewsNext

ठाणे/भिवंडी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा मंगळवारी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे म्हात्रे यांनी आपला राजीनामा ईमेलद्वारे पाठवला आहे.

म्हात्रे यांच्या राजीनाम्याने ठाणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मोठी हानी होणार आहे. आपण आपल्या वैयक्तिक कारणाने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हात्रे यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच, ते आता दुसऱ्या पक्षात जातील काय, अशीही चर्चा होत आहे. 

Web Title: In a shock to the NCP in Thane, Suresh Mhatre resigned from the post of District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.