भिवंडीत ११५० विद्यार्थ्यांनी कामतघर येथील काटेकर मैदानात केली योगासन
By नितीन पंडित | Published: June 21, 2023 06:58 PM2023-06-21T18:58:39+5:302023-06-21T18:58:50+5:30
सूर्य दक्षिणायनात प्रवेश करीत असताना पृथ्वीच्या अतिशय जवळ असतो.
भिवंडी : जागतिक योग दिना निमित्त माजी उपमहापौर मनोज काटेकर यांच्या वतीने कामतघर येथील स्व.मोतीराम काटेकर मैदानात पतंजली योग संघटना भिवंडी यांच्या सहकार्याने बुधवारी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी भव्य योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ मनोज काटेकर, पतंजली योग संघटनेचे उमेश पारेख,पी एन पाटील यांच्या शुभहस्ते द्वीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या योग कार्यक्रमात कामतघर परिसरातील मनपा शाळा क्रमांक ३३,मनपा शाळा क्रमांक ७५,मनपा शाळा क्रमांक ४१,मनपा शाळा क्रमांक ४२,मनपा माध्यमिक तेलगू शाळा,सिस्टर निवेदिता इंग्लिश स्कूल,बाल विद्या निकेतन हिंदी विद्यालय,श्रीमती वंदनाताई काटेकर स्कूल,अभिनव बाल विद्या मंदिर,कृष्णा कान्हा चौधरी माध्यमिक हिंदी विद्यालय, त्यनारायण हिंदी विद्यालय या ११ शाळांमधील ११५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सूर्य दक्षिणायनात प्रवेश करीत असताना पृथ्वीच्या अतिशय जवळ असतो. त्यामुळे सूर्याची किरणे ही शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात.त्यामुळे योग साधनेला शास्त्रीय महत्व सुध्दा आहे असे प्रतिपादन मनोज काटेकर यांनी यावेळी केले. यावेळी पतंजलीच्या योग साधकांनी सहभागी विद्यार्थ्यांकडून सहज करता येण्याजोगी व मनःशांती एकाग्रता वाढी साठीचे योगासन करून घेतली.