भिवंडीत भोंदू बाबांनी केली महिलेची ५० हजारांची फसवणूक
By नितीन पंडित | Published: April 4, 2023 05:13 PM2023-04-04T17:13:41+5:302023-04-04T17:13:50+5:30
कशेळी येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या ललिता हरिकेष उपाध्याय या घरी होत्या
भिवंडी - गृहशांतीसाठी घरात पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने महिलेची ५० हजार रुपयांची तीन भोंदू बाबांनी फसवणूक केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोन भोंदू बाबांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशेळी येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या ललिता हरिकेष उपाध्याय या घरी होत्या. त्यावेळी दोन इसम यांनी आपण साधू असल्याचे सांगत तुमच्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी असून घरातील सर्व अडचणी समस्या दूर करू असं सांगितले. घरामध्ये सुख शांतीसाठी पुजापाठ करुन देऊ असे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुजेच्या सामानासाठी रोख ५० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारी वरून छोटेलाल यादव,लालु यादव, हिरालाल यादव सर्व रा.मिश्राईनपुर जि.भदोही, उत्तरप्रदेश यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे