भिवंडीत गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास अटक
By नितीन पंडित | Published: February 5, 2024 10:11 PM2024-02-05T22:11:40+5:302024-02-05T22:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : जिवंत काडतुसासह गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाला शांतीनगर पोलिसांनी रविवारी सापळा रचून अटक केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : जिवंत काडतुसासह गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाला शांतीनगर पोलिसांनी रविवारी सापळा रचून अटक केली आहे. संभाजी उर्फ बाल्या शंकर रामआश्रय वय २३ वर्ष रा. गायत्री नगर,भिवंडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गायत्री नगर परिसरात एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन येणार असल्याची खबर शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे व त्यांच्या पथकाला मिळाली होती. या पथकाने सदरची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी,सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धार्थ गाडे व शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांना देत पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे, पोलीस हवालदार संतोष पवार, पोलीस नाईक श्रीकांत पाटील,पोलीस शिपाई नरसिंह शिरसागर, रोशन जाधव,तोफिक शिकलगार या यांच्या पथकाने आरोपी संभाजी उर्फ बाल्या हा गायत्री नगर येथील दक्षता देशी बार समोर उभा असताना त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस व मोबाईल असा ६ हजार १५० रुपये किमतीचा मुद्यमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.