भिवंडीत शुल्लक वादातून एकाची दगडाने ठेचून हत्या ,दोघांना सहा तासात केली अटक

By नितीन पंडित | Published: May 7, 2024 08:56 PM2024-05-07T20:56:28+5:302024-05-07T20:57:08+5:30

आकलेश जयसिंग, जयसिंग चौहान, वय ३६ वर्षे रा.प्रेमनगर गोरेगाव मुंबई असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

In Bhiwandi, one was crushed to death with a stone due to a toll dispute, two were arrested within six hours. | भिवंडीत शुल्लक वादातून एकाची दगडाने ठेचून हत्या ,दोघांना सहा तासात केली अटक

भिवंडीत शुल्लक वादातून एकाची दगडाने ठेचून हत्या ,दोघांना सहा तासात केली अटक

भिवंडी: ड्रायफूड दुकानात केलेल्या चोरी चा भांडाफोड करणार असल्याच्या रागातून दोघा जणांनी एका व्यक्तीची शहरातील टेमघर पाडा येथील निर्जनस्थळी दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासात दोघा आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांनी यश आले असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आकलेश जयसिंग, जयसिंग चौहान, वय ३६ वर्षे रा.प्रेमनगर गोरेगाव मुंबई असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी दहा ते साडे सह वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आकलेश जयसिंग चौहान यास कल्याण भिवंडी रस्त्यावरील साईबाबा मंदिराचे पाठीमागील जंगलात त्यांचे चेहऱ्यावर तोंडावर मोठा दगड मारून हत्या केल्याचे उघडकीस आले.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मयताची ओळख पटवली .व त्यानंतर साईबाबा मंदिर व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पद्मानगर परिसरातून इकलाख अहमद अली अन्सारी व रामनारायण सितोसी चव्हाण या दोघा संशयितांना अवघ्या सहा तासात ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी इकलाख अन्सारी याने ड्रायफूड दुकानात केलेल्या चोरीचा प्रकार हत्या झालेल्या इसमास माहित होता, हा चोरीचा प्रकार तो लवकरच उघड करणार होता. या रागातून त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.मयत व्यक्तीचा भाऊ निलेश जयसिंग चौहान यांनी दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलिस ठाण्यात दोघां विरोधात हत्येचा गुन्हा दाखल दोन्ही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
 

Web Title: In Bhiwandi, one was crushed to death with a stone due to a toll dispute, two were arrested within six hours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.