भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद; दहा गुन्हे उघडकीस ,सहा दुचाकी केल्या जप्त 

By नितीन पंडित | Published: June 6, 2024 05:21 PM2024-06-06T17:21:26+5:302024-06-06T17:21:57+5:30

भिवंडी शहरातील नारपोली व कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरीचा गुन्हा उघड करण्यात आला आहे.

in bhiwandi the crime branch arrested the in thief ten crimes were solved and six bikes were seized  | भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद; दहा गुन्हे उघडकीस ,सहा दुचाकी केल्या जप्त 

भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद; दहा गुन्हे उघडकीस ,सहा दुचाकी केल्या जप्त 

नितीन पंडित, भिवंडी: शहर व संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एका सराईत गुन्हेगार मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा यास अटक केली असून त्याच्या जवळून सहा दुचाकी व एक मोबाईल असा एकूण ६ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

भिवंडी शहरातील नारपोली व कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार ,शरिराज माळी व पोलीस  कर्मचारी अमोल देसाई,सचिन जाधव,भावेश घरत,अमोल इंगळे हे करीत होते.वाहन चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार कडील माहिती नुसार पोलीस शिपाई अमोल इंगळे यांना एका संशयित आरोपीचे नाव समजले. गुन्हे शाखेच्या पोलीस  पथकाने मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा यास शहरातील खान कंपाऊंड शांतीनगर येथून ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.त्यानंतर तपासात त्याने भिवंडी शहरा सोबत वागळे इस्टेट,वर्तकनगर,मुंब्रा,नौपाडा,शिळडायघर,कापूर बावडी या भागातून चोरी केलेल्या आठ वाहन चोरीच्या गुन्ह्यासह एक घरफोडी व एक मोबाईल चोरीचा असे दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

दुचाकी गॅरेज मध्ये हेल्पर म्हणून काम करणारा मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा हा सराईत गुन्हेगार असून मागील पाच वर्षं पासून त्या विरोधात २९ गुन्हे नोंद आहेत.या आरोपीस भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी यावेळी दिली.

Web Title: in bhiwandi the crime branch arrested the in thief ten crimes were solved and six bikes were seized 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.