भिवंडीत १४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला केवळ १

By नितीन पंडित | Published: October 17, 2022 03:48 PM2022-10-17T15:48:12+5:302022-10-17T15:49:00+5:30

तालुक्यातील गोरसई,सावंदे,मोहंडूळ,अंबाडी,चाणे,गणेशपुरी,खडकी बुद्रुक,दाभाड,पालखणे,मालबिडी,मौंदे,पिळंझे,सुपेगाव,चिंबीपाडा या १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे

In Bhiwandi, the Uddhav Thackeray faction killed the former, the Shinde faction only 1 Gram Panchayat | भिवंडीत १४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला केवळ १

भिवंडीत १४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला केवळ १

googlenewsNext

भिवंडी : - भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने १४ ग्राम पंचायती जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे अवघी घोडगाव हि एकमेव ग्राम पंचायत आली असल्याने शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे यांना हि या निवडणुकीतील अपयशाला सामोरे जावे लागले आहे.तर भाजपाने अवघ्या सात ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक जिंकली आहे.
          
तालुक्यातील गोरसई,सावंदे,मोहंडूळ,अंबाडी,चाणे,गणेशपुरी,खडकी बुद्रुक,दाभाड,पालखणे,मालबिडी,मौंदे,पिळंझे,सुपेगाव,चिंबीपाडा या १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे. या ग्राम पंचायत निवडणुकीत मनसेने आपले खाते उघडले असून शिरोळे व दिघाशी या दोन ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विजय संपादन केला. तर कवाड,गाणे, पारीवली,पाच्छापूर,वेढे,खरीवली, पिंपळघर याठिकाणी भाजपाने यश मिळविले आहे.तर काँग्रेस व राष्ट्रवादीला 
          
कामतघर येथील वऱ्हाळमाता मंगल भवन येथे सकाळी १० वाजता मतमोजणीस तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरुवात करण्यात आली होती. दुपारी एक वाजता ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार यांनी यावेळी निरीक्षक म्हणून या मतमोजणी वर लक्ष ठेवले होते.
           
शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या नेतृत्वाखाली चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.विजयी उमेदवार बाहेर पडताच त्यांच्या समर्थकांकडून गुलाल उधळत विजयाच्या घोषणा देत जल्लोष साजरा केला .

एकुण ग्रामपंचायत- ३१

शिवसेना - १४
शिंदे गट  - ०१
भाजप    - ०७
राष्ट्रवादी  - ००
काँग्रेस    - ००
मनसे      - ०२
इतर       - ०७

Web Title: In Bhiwandi, the Uddhav Thackeray faction killed the former, the Shinde faction only 1 Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.