झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित; भिवंडीत हजारो जैन धर्मीय रस्त्यावर
By नितीन पंडित | Published: January 2, 2023 07:30 PM2023-01-02T19:30:37+5:302023-01-02T19:37:03+5:30
झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित केल्याने त्या स्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार असून त्या विरोधात संपूर्ण देशभरातील जैन धर्मीय संतप्त झाले असून याठिकाणी घोषित केलेले पर्यटन क्षेत्र तात्काळ रद्द करून जैनतीर्थं क्षेत्र घोषित करावे.
भिवंडी - झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित केल्याने त्या स्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार असून त्या विरोधात संपूर्ण देशभरातील जैन धर्मीय संतप्त झाले असून, याठिकाणी घोषित केलेले पर्यटन क्षेत्र तात्काळ रद्द करून जैनतीर्थं क्षेत्र घोषित करावे. यासाठी भिवंडीत श्री समस्त जैन महासंघ यांच्या नेतृत्वाखाली हजारो जैन धर्मीय स्त्री पुरुष यांनी सोमवारी विराट मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.श्री समस्त जैन महासंघ भिवंडी यांच्या नेतृत्वाखाली अंजुरफाटा येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व आचार्य पुण्यरत्न सुरी महाराज,आचार्य यशोरत्न सुरी महाराज,आचार्य अक्षय बोधी सुरी महाराज,मुनिराज विनम्र सागर विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्च्या मध्ये हजारोच्या संख्येने जैन स्त्री पुरुष युवक युवती सहभागी झाले होते.
जैन धर्मीयांसाठी पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्मेतशिखर,झारखंड येथील क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घोषणा केली असून पालिताना येथील गिरीराज क्षेत्र येथील जैन तिर्थस्थळ असलेल्या ठिकाणी धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे .त्या विरोधात संपूर्ण देश भरातून जैन धर्मीयांमधून संताप व्यक्त केला जात आहे.सदर तीर्थ क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास त्यामुळे सदर तीर्थस्थळावर मांस मदिरा आणि इतर बरेच गैर व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे जैन धर्मियांमध्ये रोष निर्माण होत आहे.
त्यामुळे जैन लोकांच्या धार्मिक आस्थेला मोठा आघात झालेला आहे. त्यामुळे जैन धर्माच्या आस्थेला पवित्र स्थळ सम्मेतशिखरजी ला पर्यटन स्थळ घोषित करू नयेत आणि या पुढे देखिल कोणत्याही धार्मिक स्थळ यांना पर्यटन स्थळ घोषित करण्यात येवु नये अशी मागणी आचार्य अक्षयबोधी सुरीश्वरजी महाराज यांनी केली आहे .उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर आंदोलक आल्या नंतर तहसीलदार अधिक पाटील यांना आपल्या तीव्र भावना व्यक्त करणारे निवेदन श्री समस्त जैन महासंघ भिवंडी चे अध्यक्ष मिठालाल जैन,अशोक जैन व इतर पदाधिकारी यांनी निवेदन दिले.
सरकारचे हे कृत्य समस्त जैन धर्मीय कदापि खपवून घेणार नाही असा इशारा मुनिराज विनम्र सागर विजयजी यांनी देत,या अन्याया विरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला आहे ,जर हाच समाज बँकेत गेला तर सर्व अर्थ व्यवस्था हादरवून ठेवू शकतो असा गर्भित इशारा मुनिराज विनम्र सागर विजयजी यांनी दिला