उल्हासनगर महापालिका मुख्यालय समोर मनसेने फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी
By सदानंद नाईक | Published: September 6, 2023 08:00 PM2023-09-06T20:00:41+5:302023-09-06T20:00:56+5:30
दहीहंडी फुटतात पडला पैशाचा पाऊस
उल्हासनगर : महापालिकेत प्रशासकीय कालावधीत सर्वच विभागात भ्रष्ट्राचार बोकाळल्याचा आरोप मनसेने करून मंगळवारी सायंकाळी भ्रष्ट्राचाराची दहीहंडी फोडण्यात आली. फोडलेल्या दहीहंडीच्या दही ऐवजी बनावट नोटा ठेवल्याने, दहीहंडी फुटतात नोटांचा पाऊस पडला.
उल्हासनगर महापालिकेतील पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण विभाग, नगररचनाकार विभाग, अतिरिक्त आयुक्त जुईकर प्रकरण, मालमत्ता कर विभागासह अन्य विभागात भ्रष्ट्राचाराचे प्रकरण बाहेर येत आहे. तर दुसरीकडे रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, शाळा मैदानावर सनद, सार्वजनिक समाजमंदिराचा गैरवापर, डम्पिंग ग्राऊंड प्रश्न, उद्याने, मैदानाची दुरावस्था, कचऱ्याचे ढीग, साफसफाईचा बोजवारा उडाला आहे.
या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ मनसेने महापालिका मुख्यालय समोर भ्रष्ट्राचाराची दहीहंडी उभारून मनसेचे मनोज शेलार यांच्यासह पदाधिकार्यांनी फोडली आहे. दहीहंडीत दही ऐवजी बनावट।नोटा ठेवल्याने दहीहंडी फोडतात पैशाचा पाऊस पडल्यावर सर्वांनीच पैसे घेण्यासाठी धाव घेतली. असेच चित्र महापालिकेत असल्याची टीका मनसेचे माजी शहाराध्यक्ष बंडू देशमुख व मनोज शेलार यांनी व्यक्त केला आहे.
मनसेच्या दहीहंडीने महापालिकेच्या एकून कारभारावर प्रश्नचिन्हे उभे केले आहे. नगररचनाकार विभागात बोगस कर्मचारी सापडून गुन्हा दाखल झाला. मात्र अध्यापही पुढील कारवाई झाली नाही. चलती है क्या बाहेर? असा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी करून चौकशी झाली, मात्र कारवाई ठप्प, महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या दोन वर्षातील कोट्यवधींचे कामाची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी होत आहे, ठेकेदारांची केलेल्या टक्केवारी आरोपाचे काय?
कंत्राटी कामगाराच्या पगारावर डल्ला मारणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यावर कारवाई नाही. असे अनेक प्रकारावर आयुक्त अजीज शेख यांनी भूमिका न घेतल्याने, महापालिका कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर मनसेने भ्रष्ट्राचाराची दहीहंडी फोडल्याने, महापालिका कारभाराचा गोंधळी कारभार उघड झाला आहे.