उल्हासनगर महापालिका समोर आशा सेविकांचा ठिय्या, बोनस नाहीच
By सदानंद नाईक | Published: November 13, 2023 08:42 PM2023-11-13T20:42:53+5:302023-11-13T20:43:07+5:30
आशा सेविकांच्या मागणीबाबत आयुक्त अजीज शेख यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.
उल्हासनगर : दिवाळीपूर्वी आशा सेविकांनी महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून बोनससह वाढीव मानधनाची मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीला महापालिकेने कचऱ्याची टोपली दाखविल्याने, त्यांनी सोमवारी पुन्हा एकत्र बोनस व वाढीव मानधनाची मागणी केली.
उल्हासनगर महापालिका अंतर्गत आरोग्य सेवेचे काम करणाऱ्या आशा सेविकांनी दिवाळीपूर्वी महापालिका प्रवेशद्वार समोर बोनस व वाढीव मानधनासाठी आंदोलन केले होते. आशा सेविकांच्या मागणीबाबत आयुक्त अजीज शेख यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात वाढ न करता बोनसही दिला नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली होती. सोमवारी महापालिका प्रवेशद्वार समोर आशा सेविकेंनी एकत्र येत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला. आशा सेविका महापालिकेच्या आरोग्य केंद्रासह प्रत्येक झोपडपट्टीत जावुन रुग्णा पासुन ते गरोदर स्त्रियांना रुग्णालयात नेवुन त्यांचे कामे करतात. दरम्यान महापालिकेच्या प्रत्येक उपक्रमा मध्ये आशासेविकांचे योगदान महत्वाचे आहे. तर दुसरीकडे त्यांना तुटपुंज्या मानधनावर कामे करावे लागत आहे. मानधनात वाढ अथवा बोनस न दिल्यास, दिवाळीनंतर भीक मागो आंदोलन करणार असल्याचे प्रतिक्रिया आशा सेविकांनी दिली आहे.