अवघ्या दिड महिन्यातच भंडार्लीचा कचरा प्रकल्प पडला बंद, प्लान्टमध्ये पाणी शिरले, मशीनमध्ये साड्या, गाद्यांचा लोड

By अजित मांडके | Published: September 15, 2022 05:50 PM2022-09-15T17:50:46+5:302022-09-15T17:51:47+5:30

ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून भंडार्ली येथे कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली. त्यानुसार जानेवारी महिन्यात येथील प्रकल्प सुरु होईल असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता.

In just a month and half, Bhandarli's garbage plant was shut down, water entered the plant, loads of sarees, mattresses in the machine. | अवघ्या दिड महिन्यातच भंडार्लीचा कचरा प्रकल्प पडला बंद, प्लान्टमध्ये पाणी शिरले, मशीनमध्ये साड्या, गाद्यांचा लोड

अवघ्या दिड महिन्यातच भंडार्लीचा कचरा प्रकल्प पडला बंद, प्लान्टमध्ये पाणी शिरले, मशीनमध्ये साड्या, गाद्यांचा लोड

Next


ठाणे : भंडार्ली येथील कचऱ्यावर दिड महिन्यांपूर्वी प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु पावसाळ्यात प्लान्टमध्ये पाणी शिरल्याने आणि मशिनमध्ये साड्या, गाड्या, फर्निचरचे साहित्य अडकत असल्याने दोनही मशीन बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प ७ सप्टेंबर पासून बंद करण्यात आला असून पुन्हा कचरा दिवा डम्पींगवर टाकला जात आहे. मात्र येत्या २ ऑक्टोबर पासून दिव्याचे डम्पींग कायमचे बंद करण्याचा दावा पालिकेने केला आहे.  

  ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून भंडार्ली येथे कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली. त्यानुसार जानेवारी महिन्यात येथील प्रकल्प सुरु होईल असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. त्यानंतर साधारणपणो दिड महिन्यापूर्वी येथे ६०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. उर्वरीत ३०० मेट्रीक टन कचरा हा दिवा डम्पींगवरच टाकला जात होता असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु मधल्या काळात झालेल्या धुवाधार पावसामुळे त्याचा परिणाम येथील प्रकल्पावर झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन मशिन असून या मशिनमध्ये कचऱ्या  ऐवजी साडय़ा, गाद्या, फर्निचर आदींसह इतर वस्तु अधिक प्रमाणात येत होत्या. त्या मशिनमध्ये अकडून मशिन वारंवार बंद पडत होत्या. त्यातही प्लान्टमध्ये पाणी शिरल्याने त्याचा परिणाम देखील या प्रकल्पावर झाला. याशिवाय पावसामुळे येथील जोड रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहने जाणो देखील मुकि झाल्याने अखेर ७ सप्टेंबर पासून येथे कचरा टाकणो किंबहुना हा प्रकल्प बंद करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली.  

२ ऑक्टोबर पासून दिव्याचे डम्पींग होणार बंद
एकीकडे या प्रकल्पात आजही अडचणी असल्याचे दिसत आहे. याठिकाणी संपूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. मुंब्रा आणि दिव्याचा ३०० मेट्रीक टन कचरा आजही या प्रकल्पाच्या ठिकाणी जात नसल्याची बाबही समोर आली आहे. यामध्ये अडचणी असल्याने येथील कचरा भंडार्लीला नेता येत नसल्याचे पालिकेचे म्हणने आहे. याठिकाणी आवश्यक असलेले १० चाकी मोठे डम्पंर (आयवा वाहने) जात नाहीत, येथील रस्ता देखील अरुंद असल्याने वाहनांची ये जा करणो शक्य नाही. तसेच प्रोसेसींगची सुविधा व इतर सुविधा उपलब्ध नसल्याने येथील कचरा आजही दिव्याच्या डम्पींगवर टाकला जात आहे. परंतु आता येत्या २ ऑक्टोबर पासून दिव्याचे डम्पींग बंद करण्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंब्रा, दिव्याचा कचऱ्याला दिली जाणार तात्पुरती पर्यायी जागा
मुंब्रा, दिव्यातील 3क्क् मेट्रीक टन कचऱ्यासाठी आता पालिकेने दोन पर्याय पुढे आणले आहेत. त्यामध्ये मुंब्य्रातील कचरा आता एमएम व्हॅली येथील पालिकेच्या आरक्षित भुखंडावर तर दिव्यातील कचरा हा डावले येथील शासकीय भुखंडावर टाकला जाणार आहे. येत्या २८ सप्टेंबर र्पयत हे दोन्ही तात्पुरत्या स्वरुपातील प्रकल्प सुरु होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. याठिकाणी गोळा होणारा कचरा पुढे भंडार्लीला नेला जाणार असून २ ऑक्टोबर पासून पूर्ण क्षमतेने येथील प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

दिव्याची कचऱ्याची समस्या येत्या २ऑक्टोबर पासून कायमची सुटणार आहे. भंडार्ली येथील प्रकल्प याच दिवसापासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यासाठीच पालिकेने मुंब्रा आणि दिव्यात तात्पुरत्या स्वरुपातील कचरा डम्प करण्यासाठी जागा शोधल्या आहेत.
(मनीष जोशी - उपायुक्त, घनकचरा विभाग, ठामपा)
 

Web Title: In just a month and half, Bhandarli's garbage plant was shut down, water entered the plant, loads of sarees, mattresses in the machine.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे