कल्याण लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 30 उमेदवार वैध तर 4 अवैध 

By सुरेश लोखंडे | Published: May 4, 2024 09:27 PM2024-05-04T21:27:37+5:302024-05-04T21:27:58+5:30

मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 03 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजता संपली.

In Kalyan Lok Sabha Constituency, after scrutiny, 30 candidates are valid and 4 are invalid | कल्याण लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 30 उमेदवार वैध तर 4 अवैध 

कल्याण लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 30 उमेदवार वैध तर 4 अवैध 

ठाणे : -कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शनिवार दि 04 मे 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता  पार पडली. या छाननी प्रक्रियेत 24-कल्याण लोकसभा मतदारसंघात 04 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीत 30 उमेदवार वैध ठरले आहेत, अशी माहिती 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. 24-कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 03 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजता संपली.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर 24-कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 34 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जाची शनिवार, दि. 04 मे 2024 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे 24-कल्याण लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक श्री.मनोज जैन (आयएएस) हे उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची 24-कल्याण लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी छाननी केली.

24-कल्याण लोकसभा मतदारसंघात वैध ठरलेले उमेदवार :- 30*

24-कल्याण लोकसभा मतदारसंघात अवैध ठरलेले उमेदवार :- 4
1) हबीबुर रेहमान ओबेदुररहेमान खान – अपक्ष उमेदवार,
2) जमिला इरफान शेख – अपक्ष उमेदवार,
3) काशिनाथ विठ्ठल नारायणकर – अपक्ष उमेदवार व
4) अश्फाक अली सिध्दीकी - अपक्ष उमेदवार.
 
अर्ज केलेल्या उमेदवारांना दि. 06 मे 2024  रोजी दु.3.00 वाजेपर्यंत आपला उमेदवारी  अर्ज मागे घेता येणार आहे.

Web Title: In Kalyan Lok Sabha Constituency, after scrutiny, 30 candidates are valid and 4 are invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.