माविआमध्ये पक्ष बघून निधी दिला जातो; खासदार श्रीकांत शिंदे यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:05 PM2022-06-25T18:05:39+5:302022-06-25T18:07:34+5:30
महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्ष बघून निधी दिला जात असल्याचा गंभीर आरोप शनिवारी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्ष बघून निधी दिला जात असल्याचा गंभीर आरोप शनिवारी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. शिवसंपर्क अभियानातून अनेक आमदारांनी ही खदखद व्यक्त करुन दाखविला असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. इतिहासात शिवसेनेत एवढा असंतोष कधीच वाढला नव्हता. मात्र मागील अवघ्या अडीच वर्षात हा अंसतोष अधिक वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर त्यांच्या समर्थकांनी शनिवारी ठाण्यातील शिंदे यांच्या निवास्थानाबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी उपस्थितीतांना संबोधतांना श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. शिंदे यांनी केवळ ठाणो किंवा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातही काम केले. त्यामुळेच त्यांना या आमदारांचा पाठींबा लाभल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच शिवसेनेतील आमदारांनी त्यांना सोबत दिली आहे. तसेच इतर अपक्ष आमदार देखील त्यांच्या सोबत आहेत. तर मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीत राहून शिवसेनेची गळचेपी झालेली आहे, त्यामुळे आघाडीतून बाहेर पडले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सत्तेत आल्यावर सर्वाना अपेक्षा होती, आपला मुख्यमंत्री असल्याने चांगले दिवस मात्र या अपेक्षा फोल ठरल्याचे त्यांनी सांगितले. आजही कार्यकर्ता खांद्यावर ङोंडा घेऊन केवळ लढतोय, त्याचा अपेक्षा भंग झालेला आहे. पक्ष कुठेतरी कमी पडत असल्याने आम्हाला शिवसंपर्क अभियानासाठी पाठविण्यात आले होते.
मात्र यामध्ये कार्यकत्र्यामधील असंतोषापेक्षा आमदारांच्या मनात अधिक खदखद दिसून आली. जिथे जिथे शिवसेनेचे जास्त आमदार आहेत, तिथे राष्ट्रवादी ने त्यांचा पालकमंत्री घेतला. त्यानुसार शिवसेनेच्या आमदाराला निधी न देता तो निधी त्यांनी आपल्याकडे वळविल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सात:यात साखर कारखाने अधिक आहेत, येथे राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसत आहे. त्यामुळे येथे उस विकण्यासाठी गेलेल्या आधी पक्ष विचारला जातो, जर त्याने शिवसेना सांगितले तर त्याला शेवटी उभे केले जाते असा आरोपही त्यांनी केला. अडीच दोन्ही कॉंग्रेसने शिवसेना कशी संपले याचाच विचार केला असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदारांनी आपली कैफीयत मांडली खरी मात्र त्यांचे ऐकले गेले नाही, त्यामुळे त्यांनी ही कैफीयत शिंदे यांच्याकडे मांडली आणि त्यांनी ती ऐकली. त्यामुळे शिंदे किंवा इतर आमदारांनी घेतलेला निर्णय चुकीचा कसा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आता त्याच आमदारांच्या घरांवर कार्यालयावर दगडफेक केली जात आहे, ही काही मोगलाई नाही, आम्ही शिंदे आणि आनंद दिघे यांचे शिवसैनिक आहोत, आम्ही शांत आहोत, आमची माथी भडकवण्याचे काम करु नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्यात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत असतांना ठाणो जिल्ह्यात पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. त्यांनी जिल्ह्यात विकासकामांसाठी निधी दिला. त्यांनी पक्ष वाढीचाच नेहमी विचार केला, त्यामुळे त्यांनी जे केले ते योग्यच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजही आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेनेत आहोत असा दावाही त्यांनी यावेळी केला. शिंदे यांनी जिल्ह्यात शिवसेना सांभाळली.
ठाणो महापालिकेतील सर्व ६७ नगरसेवक एकनाथ शिंदे बरोबर असल्याचा दावा यावेळी नरेश म्हस्के यांनी केला. आनंद दिघे यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणो जिल्ह्यात शिवसेना सांभाळली म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही आजही शिवसेनेत आहोत, आणि शिवसेनेतच राहणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी तोडा, आमदारांची भुमिका बरोबर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.