महाराष्ट्रात सत्तेच्या साठ मारीत जनतेचा जीव धोक्यात : विजय वडेट्टीवार
By अजित मांडके | Published: August 17, 2023 12:45 PM2023-08-17T12:45:18+5:302023-08-17T12:45:46+5:30
शहर सौंदरीकरणावर करोड्यांचा खर्च केला जात आहे, मुख्यमंत्री ग्लोबलचे स्वप्न दाखवत आहेत.
ठाणे : शहर सौंदरीकरणावर करोड्यांचा खर्च केला जात आहे, मुख्यमंत्री ग्लोबलचे स्वप्न दाखवत आहेत. मात्र इकडे लोकांचे जीव जात असताना त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत असल्याचा आरोप राज्याची विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यात जे खुनी त्यांच्याच हाती चौकशी समिती दिली आहे त्यामुळे चौकशी काय होणार हे यातून दिसत आहे या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल तर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून त्यांच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात सत्तेच्या साठ मारीत जनतेचा जीव धोक्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
कळवा रुग्णालय म्हणजे भ्रष्टाचारांचा अड्डा आहे या ठिकाणी डॉक्टर नर्सेस यांची कमतरता आहे तसेच सुविधांचा देखील अभाव आहे त्यामुळे हे रुग्णालय महापालिकेला चालवायला येत नसेल तर त्यांनी शासनाकडे द्यावे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे मात्र राज्यात सत्तेची साठमारी सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला. केवळ आपल्या मर्जीतल्या लोकांना ठेका मेळावा यासाठीच कळवा रुग्णालय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. कळवा रुग्णालयात स्वच्छता न करता केवळ बिले काढले जात आहेत. रुग्णालयात जुनीच यंत्रणा कार्यान्वित असून अत्याधुनिक यंत्रणांचा अभाव असल्याचाही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाणेकरांना ग्लोबल हॉस्पिटल ची स्वप्न दाखवतात मात्र कळवा हॉस्पिटल कडे पाहिल्यास ते येथील रुग्णांच्या आरोग्याशी खेळतात की काय असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच राज्यातील आरोग्य यंत्रणेचा बट्ट्याभोळ झाला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या 50% जागा रिक्त आहेत दुसरीकडे कळवा रुग्णालय ते अनेक पद रिक्त आहेत असं असताना मग राज्यातील गडचिरोली असेल किंवा इतर ग्रामीण भागात बाग असतील त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करून काय होणार असा सवालही त्यांनी केला. कळवा हॉस्पिटलमध्ये आयसी मध्ये रुग्ण गंभीर अवस्थेत असताना त्या ठिकाणी सीनियर डॉक्टर न जाता जुनियर डॉक्टर तपासणीसाठी जात आहेत हे गंभीर असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात सत्तेच्या साठ मारीत जनतेचा जीव धोक्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तर या घटनेत मृत पावलेल्यांना किमान दहा लाखांची मदत तात्काळ दिली जावी अशी मागणी ही त्यांनी केली. तिकडे चौकशीच्या नावाखाली आरोग्य संचालकांना सुट्टीवर धाडले आहे मात्र या प्रकरणात दोषी असणाऱ्या आरोग्यमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे त्यांना घरी बसवले पाहिजे. दुखणे कुठे आणि कारवाई कुठे हे सगळेच हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.
कळवा रुग्णालयांच्या डीनला कारभार झेपत नसल्याचे दिसत असून त्यांच्या जागी नवीन डींची नियुक्ती करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी देखील आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले. महापालिका आणि हॉस्पिटल यांच्या संगणमतानेच या ठिकाणी गैरकारभार सुरू असल्याचे दिसत आहे त्यामुळे हे हॉस्पिटल शासनाकडे सुपूर्द करावे असे देखील ते म्हणाले.