बनावट बातमी कात्रण करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी 

By धीरज परब | Published: June 11, 2024 05:31 PM2024-06-11T17:31:09+5:302024-06-11T17:35:28+5:30

बनावट बातमी कात्रणचा वापर करण्याची ही पहिलीच घटना शहरातील आहे. 

in mira bhayandar advocate vyas demand to find those who are spreading fake news and file a case  | बनावट बातमी कात्रण करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी 

बनावट बातमी कात्रण करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी 

मीरारोड :  भाजपाचे मीरा भाईंदर निवडणूक प्रमुख ऍड . रवी व्यास हे पुन्हा स्वगृही जाणार अश्या आशयाची वृत्तपत्रात बातमी आल्याचे बनावट बातमी कात्रण समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी व्यास यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तांना केली आहे. बनावट बातमी कात्रणचा वापर करण्याची ही पहिलीच घटना शहरातील आहे . 

ऍड. व्यास हे पुन्हा स्वगृही जाणार आशय आशयाची समाज माध्यमांवर एखाद्या वृत्तपत्रात बातमी छापून आली असल्यागत त्याचे बनावट कात्रण व्हायरल केले गेले आहे. व्यास यांच्या पक्षांतर्गत वा बाहेरच्या विरोधकांनी हा कटकारस्थान करून प्रकार केल्याचा संशय व्यास समर्थकांना आहे . 

ऍड . व्यास यांनी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी राष्ट्रवादी पार्टीमध्ये बैठक सुरु आहे व मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहे अशा आशयाची बातमीचे कात्रण व्हायरल केले गेल्याचे निदर्शनास आले . मी भारतीय जनता पार्टीचा कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ता आहे. गेल्या १० ते ११ वर्षापासुन भाजपात नगरसेवक, जिल्हा महामंत्री, जिल्हा अध्यक्ष अश्या वेगवेगळे पदावरती कामे केलेली आहेत. सध्या पक्षाचा १४५ विधानसभा निवडणुक प्रमुख आहे . 

महाराष्ट्रात लवकरच विधानसभाचे निवडणूक लागणार असून काही काही राजकीय विरोधक, समाजकंटक व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी प्रसारमाध्यमांद्वारे माझ्याविरुद्ध खोटे व बदनामीकारक बातमीचे कात्रण बनवून वायरल केले आहे.

जाणूनबुजून माहिती तंत्रज्ञानचा गैरवापर करुन खोटी बातमी पसरवून नागरीकांमध्ये चुकीचा संदेश जाऊन समाजात बदनामी व मानहानी केली आहे . सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन कटकारस्थान रचणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी ऍड . रवी व्यास यांनी केली आहे . 

Web Title: in mira bhayandar advocate vyas demand to find those who are spreading fake news and file a case 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.