मुंब्रा: खान कंपाऊंडमधील गोदामांना लागलेली आग नऊ तासांनी विझली

By कुमार बडदे | Published: October 17, 2022 08:33 AM2022-10-17T08:33:53+5:302022-10-17T08:34:32+5:30

या आगीत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अप्तकालिन विभागातील अधिका-यांनी दिली.

in mumbra fire broke out in warehouses in the khan compound was put out after nine hours | मुंब्रा: खान कंपाऊंडमधील गोदामांना लागलेली आग नऊ तासांनी विझली

मुंब्रा: खान कंपाऊंडमधील गोदामांना लागलेली आग नऊ तासांनी विझली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंब्राःयेथील नागरी वसाहती मधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील शिळफाटा परीसरातील खान कपाऊंडमध्ये असलेल्या पत्र्यांच्या गोदामांना रविवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती.

काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केल्याने त्यामधून निघणा-या ज्वाळामुळे परीसरात खळबळ उडाली होती. शिळ अग्निशमन केंद्रातील जवान १ फायर वाहन आणि १वॉटर टँकरच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान तसेच प्रादेशिक आपत्ती विभागातील कर्मचा-यांनी नऊ तास शर्थीचे प्रयत्न करुन सोमवारी पहाटे चार वाजता दोन फायर वाहन,एक रेस्क्यू वाहन आणि तीन  मदतीने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.या आगीत अब्दूल अन्सारी आणि साहिल खान यांची पुठ्ठ्यांची तसेच एक चिंध्यांचे अशी ऐकून तीन गोदामे जळून खाक झाली. या आगीत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अप्तकालिन विभागातील अधिका-यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: in mumbra fire broke out in warehouses in the khan compound was put out after nine hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.