ठाण्यात एका महिन्यात २१ वीजचोऱ्या पकडून तब्बल ९.६० लाखांची वीजचोरी उघड

By अजित मांडके | Published: November 12, 2022 03:05 PM2022-11-12T15:05:20+5:302022-11-12T15:06:20+5:30

सध्या महावितरणच्या भांडुप परिमंडळ अंतर्गत वीजचोरी पकडण्याची जोरदार मोहीम सुरू आहे.

In one month, 21 electricity thieves were caught in Thane and electricity theft of Rs. 9.60 lakhs was revealed | ठाण्यात एका महिन्यात २१ वीजचोऱ्या पकडून तब्बल ९.६० लाखांची वीजचोरी उघड

ठाण्यात एका महिन्यात २१ वीजचोऱ्या पकडून तब्बल ९.६० लाखांची वीजचोरी उघड

Next

ठाणे - महावितरण ठाणे २ विभागातील वीज चोरांविरुद्ध मोहिमेत, नोव्हेंबर २०२२ या एका महिन्यात २१ वीजचोऱ्या पकडून तब्बल ९ लाख ६० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात यश आले आहे.

सध्या महावितरणच्या भांडुप परिमंडळ अंतर्गत वीजचोरी पकडण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. असाच एका मोहिमे अंतर्गत ठाणे-२ विभागातील विकास उपविभागांतर्गत राबोडी, चिरागनगर, बालकुम व इतर ठिकाणी तसेच पॉवर हाऊस उपविभागातील महागिरी, नागसेनगर, डाँ.आंबेडकर रोड, उथळसर व इतर ठिकाणी संशयित वीजचोरीच्या ठिकाणांची तपासणी विभागीय व उपविभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्या पथकांनी केली असता २१ वीज चोरी उघडकीस आली आहे.

ठाणे-२ विभागा अंतर्गत वीजचोरी तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १८५ ग्राहकांकडे  ८०.७१ लक्ष रक्कमेच्या वीजचोरीच्या उघड झाल्या असून १३३ ग्राहकांकडून वीज चोरीपोटी ६०.९२ लक्ष वसूल करण्यात आले असून २८ ग्राहकांवर वीजचोरी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 यापुढील कालावधीत वीजचोरी विरुद्ध तपासणी मोहीम अधिक तीव्रपणे राबविण्यात येणार आहे. ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, अनधिकृत विजेचा वापर करू नये तसेच आवश्यकतेनुसार विजेचा योग्य वापर करावा जेणेकरून वाजवी वीज बिल येईल. अनधिकृत वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे म्हटले आहे.

वीजचोरी मोहीम मुख्य अभियंता, भांडूप नागरी परिमंडल धनंजय ओंढेकर यांच्या सूचनेनुसार व अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे-२ विभागात राबविण्यात आले आहे.
 

Web Title: In one month, 21 electricity thieves were caught in Thane and electricity theft of Rs. 9.60 lakhs was revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.