ठाणे शहरात आढळणारे कोरोनाचे रुग्ण १८ वर्षांवरीलच

By अजित मांडके | Published: March 24, 2023 06:40 PM2023-03-24T18:40:47+5:302023-03-24T18:41:18+5:30

 ठाणे शहरात कोरोनाच्या संगतीने एच ३ एन २ चे रुग्ण आढळत नाहीतर त्याच्याही पहिला रुग्ण दगावला आहे. 

In Thane city, H3N2 patients are found in association with Corona, otherwise the first patient has also died  | ठाणे शहरात आढळणारे कोरोनाचे रुग्ण १८ वर्षांवरीलच

ठाणे शहरात आढळणारे कोरोनाचे रुग्ण १८ वर्षांवरीलच

googlenewsNext

ठाणे: ठाणे शहरात कोरोनाच्या संगतीने एच ३ एन २ चे रुग्ण आढळत नाहीतर त्याच्याही पहिला रुग्ण दगावला आहे. या वाढत्या रुग्ण संख्येने महापालिका प्रशासनाने सर्वच गर्दीच्या ठिकाणी अँटीजन चाचण्यांची संख्या वाढली आहे. मात्र नागरिकांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यातच सद्यस्थितीत कोरोनाबधितांमध्ये आढळले रुग्ण हे  १८ ते ८० या वयोगटातील आहे. तर, १८ वर्षाखालील सध्यातरी एकही रुग्ण कोरोनाबाधित म्हणून पुढे आलेला नाही. ठामपा हद्दीत नोंद होणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

एकीकडे कोरोना आटोक्यात आला असे म्हटले जात होते. पण, तो पूर्णपणे आटोक्यात आलाच नव्हता. एक - दोन रुग्ण दिवसाला रोज आढळून येत होते. ती संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. त्यातच गेल्या आठ दिवसात ही झपाट्याने वाढली. म्हणजे १६ ते २३ मार्च दरम्यान ठाणे महापालिका हद्दीत २१६ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १ ते २३ मार्च दरम्यान  एकूण २८५ रुग्ण आढळून आले आहेत. याचदरम्यान वाढत्या रुग्ण संख्येमुळे पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या आढावा बैठक घेत, अँटीजन चाचण्या वाढण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार चाचण्याही वाढण्यात आल्या आहे. सध्या दिवसाला दोन हजार ते २ हजार २०० चाचण्या केल्या जात आहेत. मात्र ही चाचणी करून घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नाही. मागील अनुभवामुळे ते चाचणी करून घेण्यासाठी प्रामुख्याने टाळत असल्याचे दिसत आहे. जरी सापडणारे रुग्णांची संख्या जास्त असली तरी त्यांची लक्षणेही सौम्य आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना होम क्वारंटाईन ठेवण्यावर भर दिला गेला आहे. 

ज्यांना उपचारार्थ गरज आहे अशा रुग्णांवर ठामपा रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातच कोरोनाबाधितांचा वयोमनाचा विचारल्यास हे रुग्ण प्रामुख्याने १८ वरील ते ८० वर्षापर्यंतचे आहे. त्यातच १८ वर्षाखालील एक ही रुग्ण अद्यापही नोंदवला गेला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दुसरीकडे दगावलेले रुग्ण हे ७० ते ८० या वयोगटातील आहेत. त्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा इतरही सहव्याधी असल्याची बाब ही पुढे आली आहे. याशिवाय, इतर शहरांपाठोपाठ ठाण्यात एच ३ एन २ याचे रुग्ण आढळण्यास सुरू झाली असून तो आकडा १९ इतका आहे. त्यातच बुधवारी या आजाराने एक जण दगावला आहे. एकीकडे कोरोना दुसरीकडे एच ३ एन २ या आजाराचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाल्याने आरोग्य विभाग सतर्क होत नागरिकांना काळजी घेण्याबरोबर कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याबाबत आवाहन करत आहे.

 

Web Title: In Thane city, H3N2 patients are found in association with Corona, otherwise the first patient has also died 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.